आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No High Court Judgments In The Troubled Councilor

स्वच्छता ठेक्यात दाेघांचे भांडण, तिसऱ्याचा 'लाभ'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत भरलेल्या 'रात्रीच्या दरबारातील' अत्यंत लक्षवेधी अशा साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याच्या वादात अाता 'दाेघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ' या म्हणीप्रमाणे प्रशासनाने व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले अाहे. अायुक्तांनी रामकुंड, तसेच भाविकमार्ग स्वच्छतेच्या निविदेतच नमूद केलेल्या एका अटीचा संदर्भ घेऊन साधुग्रामच्या स्वच्छतेचे काम संबंधित ठेकेदारांवर साेपवले अाहे.
जाेपर्यंत उच्च न्यायालयाचे निकालपत्र येत नाही संबंधित कामासाठी अालेल्या दाेन निविदाधारकांपैकी काेणाला एकाचे काम द्यायचे, याचा निर्णय हाेत नाही ताेपर्यंत संबंधित ठेकेदारांकडून सफाई करून घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थायी समिती अाता कसे उत्तर देते, की दाेघांच्या भांडणात तिसऱ्याची लाॅटरी लागते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
गेल्या महिनाभरापासून साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्यावरून महापालिकेत वादावादी सुरू अाहे. संबंधित काम सर्वात कमी, परंतु ३५ टक्के जादा दराची निविदा असलेल्या वाॅटरग्रेसकडे ९५ लाखांची थकबाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करून स्थायी समितीने काढून घेतले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील क्रिस्टल या कंपनीला काम देण्याचा ठराव झाला. त्याविराेधात वाॅटरग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर जवळपास दाेन अाठवडे सुनावणी चालून अखेर स्थायी समितीलाच याेग्य ताे निर्णय घेण्याचे अादेश उच्च न्यायालयाने बजावल्याचे महापालिकेचे वकील जे. शेखर यांनी पत्राद्वारे कळवले. मात्र, स्थायी समितीने उच्च न्यायालयाची प्रत हातात पडत नाही ताेपर्यंत काेणालाही काम देण्याबाबत निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट केले हाेते. या सर्वात साधुग्रामची स्वच्छता काेणी करायची, असा पेच िनर्माण झाला. महापालिकेने पंचवटी अन्य परिसरातील स्वत:चे कर्मचारी या भागात सफाईसाठी तैनात केले, परंतु त्यामुळे मूळ शहराची साफसफाई ठप्प झाल्याचा अाक्षेप घेतल्यावर रामकुंड, भाविकमार्ग येथील ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना साधुग्रामच्या स्वच्छतेचे काम देण्यात अाले. उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त नाही, स्थायी समितीकडून अादेश नाही, असे असताना अायुक्तांनी स्वअधिकारात ठेकेदाराकडील कर्मचारी सफाईसाठी लावलेच कसे, असा प्रश्न वाल्मीकी मेघवाळ मेहतर संघर्ष समितीच्या नेत्यांनी केला हाेता. त्याविराेधात अांदाेलन करण्याचाही प्रयत्न केला हाेता. दरम्यान, यासंदर्भात अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना विचारले असता त्यांनी साधुग्राममधील सफाईसाठी अन्य ठेक्यातील कर्मचाऱ्यांची िनयुक्ती अापल्याच अधिकारात केल्याचे सांगितले. शहरातील अन्य स्वच्छतेच्या ठेक्यांमध्येच एक अाेळ टाकून तशी अटही घालून दिल्याचे उदाहरणासह सांगितले. जसे रामकुंड परिसर सफाई, तसेच अायुक्तांच्या अादेशाप्रमाणे अन्य काेणत्याही परिसराची असे नमूद करून ठेवल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संबंधितांमार्फत काम करून घेतले जाईल, असेही स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर गरजेप्रमाणे अायुक्तांना विनानिविदा काम देण्याचे अधिकार असल्याचाही दावा डाॅ. गेडाम यांनी केला. मात्र, त्याबाबत अाताच काही सांगणार नाही, असेही स्पष्ट केले.
पाच कोटींची बचत की उधळपट्टी ?
दाेन ठेकेदारांपैकी काेणाची निवड करावी, याबाबत जाेपर्यंत फैसला हाेणार नाही ताेपर्यंत अन्य ठेकेदारांना अायतेच सफाईचे काम मिळेल. या कालावधीत जादा काम केल्याबदल्यात त्यांना अतिरिक्त माेबदला दिला जाईल, असेही अायुक्तांनी स्पष्ट केले. थाेडक्यात, कर्मचारी वाढणार नाहीत काम मात्र हाेणार अाहे. त्यामुळे जर सद्य:स्थितीतील १७०० कर्मचाऱ्यांचे याेग्य पद्धतीने नियाेजन केले तर अन्य १३०० कर्मचाऱ्यांची गरजच भासणार नाही पर्यायानेच पाच काेटींची बचतही हाेईल. अर्थात दुसरी बाजू म्हणजे, अाता १७०० कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या द्य:स्थितीतील नियाेजित कालावधीतच साधुग्रामच्या स्वच्छतेचे कामकाज िदले जात अाहे की, अतिरिक्त राबून ते सफाई करीत अाहेत, याचा उलगडा झालेला नाही. नियाेजित कालावधी साेडून कर्मचारी काम करीत असतील तर मात्र अतिरिक्त मेहनताना म्हणून माेबदला देण्याचा युक्तिवाद रास्त मानला जाईल. पुन्हा त्यात कामगार कायद्याचे उल्लंघन वा सफाईसारखे कष्टप्रद काम निव्वळ जादा पैशाच्या अामिषाने करून घेतल्यासारख्या शंका-कुशंका उपस्थित झाल्यास नवीन वादाचे वळण लागू शकते.