आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटाबंदी : गृहबांधणी क्षेत्रात एप्रिलनंतर गती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाेटाबंदीचा गृहउभारणी क्षेत्रावर काेणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नसून, केवळ चार-पाच महिने कामाची गती थंडावणार अाहे. ही परिस्थिती सुधारल्यानंतर एप्रिलपासून गृहबांधणी क्षेत्र गती पकडणार अाहे. सात-बारा उताराही अाता कालबाह्य झाला असून, यापुढे ताे फक्त शेतकऱ्यांपुरताच मर्यादित राहणार असून शहरी लाेकांसाठी प्राॅपर्टी कार्डचा वापर केला जाणार असल्याचे प्रतिपादन क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी केले.

साेशल वेल्फेअर असाेसिएशन अाॅफ रियल इस्टेट कन्सलटंटच्या (एअारसी) वतीने रिअॅल्टर्स डेनिमित्त अायाेजित कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने हजार पाचशे रुपयांच्या जुन्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अाहे. मात्र, माेदी सरकारचा निर्णय याेग्य असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात नाेंद घेणारा ठरणार अाहे. नाेटाबंदीनंतर तीन लाख ६० हजार काेटी रुपये लाेकांनी बँकांतून काढले. तरीही साडेपाच लाख काेटी रुपयांची रक्कम बँकेत पडून अाहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न काही महिन्यांसाठी थांबले अाहे.
स्वच्छ भारत अभियानानंतर माेदी सरकारचे सर्वात माेठे दुसरे स्वप्न प्रत्येकाला घर देण्याचे असल्याचे त्यांच्या अनेक भाषणांतून प्रखरतेने जाणवते. त्यामुळे २०२२ पर्यंत घरांसाठी सरकारकडून भरपूर याेजना जाहीर केल्या जाण्याची शक्यता अाहे. त्यामुळे एप्रिलपासून गृहबांधणीचा व्यवसाय तेजीत येणार अाहे. अाजचे पत धाेरण ‘वेट अॅण्ड वाॅच’चे अाहे. बँकेत पैसा अाल्यामुळे गृहकर्जाचे दर कमी हाेतील अाणि त्यामुळे गृहबांधणीचे काम वेग घेणार अाहे,’ एअारसीचे अध्यक्ष राजेंद्र काेतकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास रवी वर्मा, अॅड. अवधूत सुमंत, अॅड. अनंतराव जगताप, सुनील काेतवाल, संदीप कुलकर्णी अादींसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवर माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

रेरा कायद्यामुळे पारदर्शकता
रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांवर अनेक नियंत्रणे घालण्यात अाली अाहेत. मात्र, हा कायदा १०० टक्के चांगला अाहे. या कायद्यामुळे काही प्रमाणात घरांच्या किमतीत वाढ हाेईल, पण ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही. तसेच, ग्राहकांना प्री-लाॅन्चचा फायदा देता येणार नाही. या कायद्यामुळे टायटलचा विमा बांधकाम व्यावसायिकांना काढावा लागणार अाहे. यापूर्वी अटी-शर्थीनुसार ग्राहकांकडून विमा काढला जात हाेता, असेही कटारिया यांनी यावेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...