आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक कंपन्यांकडे ठेवीदारांचा डाटा नाही, पाेलिस तपासात अडचण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मैत्रेय’च्या ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यास सुरुवात झाल्याने केबीसी, विकल्प आणि इमूच्या यापुर्वी फसवणूक झालेल्या ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याची अाशा वाढीस लागली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि शासनाच्या वतीने केबीसी कंपनीची सुमारे शंभर कोटींच्या मालमत्ता विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, कंपनीच्या ठेवीदारांचा डाटाच कंपनी अाणि तपास विभागाकडे उपलब्ध नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत कशा कराव्या याबाबत यंत्रणेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केबीसी कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्या शहर आणि जिल्ह्यातील स्थावर जंगम मालमत्ता विक्रीचा लिलाव करण्याच्ी बाब शासनाच्या विचाराधीन आहे. सोने, शेती, प्लॉट, वाहन, इमारती आणि इतर अशी सुमारे शंभर ते दीडशे कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. यापैकी काही मालमत्ता विक्री करण्याची प्रक्रिया न्यायालय आदेशानुसार शासनस्तरावर सुरू आहे.
लिलावप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये एस्क्रो खाते उघडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, केबीसीत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनी नेमकी किती रक्कम गुंतवणूक केली याची माहिती कंपनीकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब तपासात नउघड झाली अाहे. कंपनीच्या व्यवहारांचा संपूर्ण तपशील असलेली हार्डडिस्क कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली अाहे. मात्र, अद्याप हार्डडिस्कचे काम पूर्ण झाल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहे. चव्हाण दांपत्यांसह कंपनीचे काही संचालक वगळता इतर संचालक आणि त्यांचे नातेवाइक जामिनावर बाहेर आहेत. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला सुरू आहे. त्यामुळे केबीसीच्या ठेवीदारांच्या नजरा न्यायालय काय अादेश देते याकडे लागल्या आहेत.

ठेवीदारांच्या रांगा : केबीसीसह इतर कंपनीचे ठेवीदार आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी करत अाहे. आमच्या ठेवी कधी परत मिळणार याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली जात असून, या ठेवीदारांना समजावताना अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे.

ठेवीदारांची कागदोपत्री फसवणूक
केबीसी,इमू, विकल्प या कंपन्यांनी ठेवीदारांना प्रलोभन देत कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्याबदल्यात त्यांना ठेवी ठेवल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र या ठेवीदारांची कायमस्वरूपी माहितीचा डाटा कंपनीच्या संचालकांनी जतन केल्याने ठेवीदारांनी नेमकी किती गुंतवणूक केली याबाबत कंपनी अाणि ठेवीदारांच्या कागदपत्रांमध्ये तफावत अाढळली आहे.
बातम्या आणखी आहेत...