आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अखंडित विजेसाठी यंत्रणेचे सक्षमीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - शहरात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली असून, एकात्मिक विद्युत विकास याेजनेंतर्गत शहरी भागात महावितरणच्या वतीने यंत्रणा सक्षमीकरणाचा अडीच वर्षांचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये वीजबिल भरणा केंद्राच्या जिल्हास्तरीय एजन्सी दिल्या जाणार आहेत. तसेच, अतिहानीच्या फीडर्सवर व्यवस्थापक नेमण्याचा प्रस्ताव महावितरणच्या विचाराधीन आहे.

पायाभूत आराखडा टप्पा साेबत ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय आणि शहरी भागासाठी महावितरणच्या वतीने यंत्रणा सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पायाभूत आराखडा टप्पा यशस्वीपणे राबविण्यात आला असला तरी त्या अंतर्गत काही कामे अपूर्ण आहेत. ती कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पायाभूत आराखडा ची कामे नाशिकसह राज्यात सुरू आहेत. त्यातून येत्या दाेन वर्षांत ३३ केव्हीची ६०६ उपकेंद्रे, २९ हजार ४७ वितरण राेहत्रे, २७ हजार ३४४ सर्किट कि.मी. उच्चदाब ३० हजार ६४० सर्किट कि.मी. लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहे.

तीनलाख जाेडण्या : राज्यातएक लाख ६३ हजार कृषिपंपांची मागणी दाेन वर्षांपासून प्रलंबित आहे. ही मागणी पूर्ण करताना तीन लाख कृषिपंपांना जाेडण्या देऊ शकणारी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. कृषिपंपांच्या क्षेत्रात जेथे ६३ केव्हीची अतिभारीत राेहित्रे आहेत, ती बदलून तेथे १०० केव्हीची राेहित्रे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजबिल भरण्यासाठी परिमंडलाएेवजी जिल्हास्तरावर एजन्सी दिल्या जाणार आहेत. वीजबिल वसुलीची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असणा-या ग्रामपंचायतींना अर्ज केल्यास सामावून घेतले जाणार आहे. राज्याची वितरण हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असली तरी अनेक भागात हानी ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने ही हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.