आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटिंगमध्ये हार, अाता मेहनत फार; मनसेच्या अधाेगतीबाबत राज ठाकरे यांना अहवाल देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत नाशिकचा गड कायम राखण्यासाठी सत्ताधारी मनसेला प्रचंड मेहनत करावी लागेल, अशी चिंता व्यक्त करतानाच पक्षाने कामे खूप केली; मात्र त्यांच्या मार्केटिंगमध्ये अपयश अाल्याची खंत मनसेचे उपनेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. नाराज नगरसेवकांच्या भावना भविष्यातील रणनीतीबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे अहवाल देणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.
दाेन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठाेकून असलेल्या बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या सर्वच नाराज नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, नाराज नगरसेवकांच्या अडचणी प्रश्न लिहून घेतले अाहेत. त्याबाबत ठाकरे यांना अहवाल दिला जाईल. नाशिक महापालिकेची निवडणूक ताेंडावर अाली असताना पक्षातून नगरसेवक बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र असले तरी, हा ज्याच्या त्याच्या नीतिमत्ता निष्ठेचा प्रश्न अाहे. ‘ज्याची खावी पाेळी, त्याचीच वाजवावी टाळी’ असे अापले तत्त्व असून, त्यामुळेच अनेक अाॅफर अाल्यानंतरही ठाकरे कुटुंबाशी अापण एकनिष्ठ अाहे. नाशिक शहरामध्ये मनसेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पक्षाला फार मेहनत घ्यावी लागणार अाहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत तशीही मेहनत घ्यावीच लागते. मुळात मनसेने नाशिकमध्ये माेठ्या प्रमाणात कामे केली अाहेत. सीएसअार अॅक्टिव्हिटीमधून माेठ्या प्रमाणात विविध स्वरूपाची कामे झाली अाहेत. फक्त मनसेला या कामांचे मार्केटिंग माेठ्या प्रमाणात करता अालेले नाही. यासंदर्भातही ठाकरे यांच्याकडे अहवाल दिला जाईल.

गटबाजी मिटवण्यासाठी ‘डिनर डिप्लाेमसी’
मनसेत सध्या दाेन गट पडले असून, त्यात प्रामुख्याने महत्त्वाची पदे भूषवूनही संधी मिळाल्याचा दावा करणाऱ्यांचीही संख्या माेठी अाहे. मनसेतील प्रत्येकाचे लक्ष महापाैर, स्थायी समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, महानगरप्रमुख अशा पदांवर असून, ‘पदे मर्यादित मात्र इच्छुक अनेक’ अशी स्थिती असल्यामुळे मनसेतील नाराजीनाट्य थांबण्याची शक्यता कमीच अाहे. ही बाब नांदगावकर यांच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी मंगळवारी सायंकाळी ‘डिनर डिप्लाेमसी’च्या निमित्ताने सर्वांना एकत्र अाणण्याचा प्रयत्न केला.

गेडाम यांनीच राेखली मनसेची नाव
राजठाकरे यांनी समाचार घेतलेल्या माजी अायुक्त संजय खंदारे यांचे नांदगावकर यांनी काैतुक करीत चांगले काम केल्याचे सांगितले. याउलट, महापालिकेत कामे राेखण्यासाठी विचित्र कोंंडी करण्याचे काम नुकतेच बदलून गेलेल्या अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी केल्याचा अाराेपही त्यांनी नगरसेवकांच्या माहितीवरून केला. गेडाम यांच्यामुळे विकासकामांना ब्रेक लावल्याकडेही लक्ष वेधले. मुळात, याच गेडाम यांचे ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात काैतुक केले हाेते.

नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा
मनसेचे उपनेते बाळा नांदगावकर यांनी अापल्या नाशिक दाैऱ्यात मनसेच्या नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा केली. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, पक्षाच्या नाराज नगरसेवकांच्या अडचणी प्रश्न लिहून घेतले अाहेत. त्याबाबत पक्षप्रमुख ठाकरे यांना अहवाल दिला जाईल.
बातम्या आणखी आहेत...