आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No One Can Able Employee Tree Authority Committee

वृक्ष प्राधिकरण समितीला मिळेना तज्ज्ञ सदस्य, पात्रतेच्या निकषामुळे प्रशासनही अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वृक्षप्राधिकरण समितीवरील सात अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी नव्याने काढलेल्या जाहिरातीला प्रतिसाद देत १९ इच्छुकांनी अर्ज केले अाहेत. अाजवर ३० अर्ज प्राप्त झाले असून, यात पात्रतेचे निकष पूर्ण करणारे अर्हताधारक नसल्यामुळे सर्व अर्ज समितीसमाेर छाननीसाठी ठेवले जाणार अाहेत.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्याचे अादेश उच्च न्यायालयाने िदले हाेते. समितीवरील सात अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी पालिकेने चार महिन्यांपूर्वी अर्ज मागविले हाेते. त्यात प्रामुख्याने वृक्षाराेपण जतन या क्षेत्रातील विशेष ज्ञान प्रत्यक्ष अनुभव असलेल्या तीन सरकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सदस्य हाेता येईल. सामाजिक वनीकरण विभागाकडे नाेंदणीकृत अशासकीय संघटनेचा सक्रिय सदस्य असेल पर्यावरण वृक्ष लागवड क्षेत्रात दहा वर्षे कार्यरत असलेल्या व्यक्ती पात्र ठरणार अाहेत. याबराेबरच शहरातील वृक्षाराेपणासाठी माेठ्या प्रमाणात प्रायाेजक मिळवून देणारा वा वृक्ष दत्तक याेजना प्रभावीपणे राबवणाऱ्या व्यक्तीलाही अर्ज करण्याची मुभा अाहे.
कृषी-वनविज्ञान अभ्यासक्रमाची पदवी उच्च शिक्षण अर्हताधारकालाही संधी हाेती. विशेष म्हणजे ही अर्हता पूर्ण करणारे अर्ज पालिकेला मिळालेच नसल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. चार महिन्यांपूर्वी काढलेल्या जाहिरातीनंतर ११ अर्ज अाले हाेते. दरम्यान, न्यायालयाने अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत विचारणा केल्यावर काही दिवसांपूर्वी पालिकेने डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतदिली हाेती. त्यात १९ जणांनी अर्ज केले असून, यातही अनेक लाेक निकषात बसत नसल्याचे सूत्रांनी सांिगतले.