आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No One Officer Interested To Work For Sinhastha Work

सिंहस्थ कक्षासाठी अधिकारीच अनुत्सुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थ कक्षात काम करण्यास जिल्ह्यातील अधिकारी तयार नसल्याने जिल्हा प्रशासनाने स्वत:हूनच काही अधिकार्‍यांच्या नावांचा पर्याय शासनास पाठवला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांची नियुक्ती निश्चित असून, अपर जिल्हाधिकारी पदासाठी दोन व दोन जिल्हाधिकार्‍यांसाठी तीन नावे पाठविण्यात आली आहेत. तसेच, इतर नावे आताच जाहीर करण्यास जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी असर्मथता दर्शवली.

गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कक्ष निर्मितीबरोबरच जबाबदारी द्यावयाचे अधिकारी-कर्मचार्‍यांची नावे व यादीसह अहवाल त्वरित शासनास पाठवण्याचे आदेश सचिवांनी दिले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने ते पाठवले आहेत. पाटबंधारे विभागाचे एक कार्यकारी अभियंता व दोन अभियंत्यांचीही नेमणूक केली जाणार आहे. या कक्षासाठी शिपायापासून अव्वल कारकुनापर्यंत 12 ते 15 कर्मचार्‍यांची आवश्यकता भासणार आहे. ही सर्व पदे सिंहस्थ काळापुरती कंत्राटी स्तरावर भरली जाणार आहेत. लवकरच संबंधित अधिकार्‍यांच्या नावास मंजुरी मिळून प्रत्यक्षात कक्षाचे कामकाज सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.