आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थातही उडू शकेल विवाह सोहळ्याचा बार, पंचांगकर्ते माेहनशास्त्री दाते यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - सिंहस्थात लग्नमुहूर्त नाहीत, असा गैरसमज बहुतेकांमध्ये आहे, परंतु सिंहस्थातही नेहमीप्रमाणेच मुहूर्त असल्याने लग्नाचा बार उडवता येणे शक्य आहे, असे स्पष्टीकरण दाते पंचांगकर्ते माेहनशास्त्री दाते यांनी केले. लग्नमुहूर्तांबाबत समज-गैरसमज दूर व्हावेत, या हेतूने ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने अायाेजित कार्यक्रमात दाते यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

या वेळी झालेल्या प्रश्नोत्तरातून दाते यांनी नागरिकांच्या सर्व शंकांचे निसरन करीत विवाहेच्छुकांच्या माता-पित्यांची चिंता दूर केली. १४ जुलै २०१५ ते ११ ऑगस्ट २०१६ या कालावधीत सिंहस्थ आहे. तथापि, सिंह नवांशपर्यंतचा काळ मंगलकार्यासाठी वर्ज्य मानला जात असल्याने १४ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुहूर्त नाहीत.

नवांश काळ संपल्यानंतर गोदावरीच्या दक्षिणेकडील व गंगेच्या उत्तरेकडील प्रदेशात मंगलकार्य होणार आहेत. गुरू सिंह राशीत व सूर्य मेष राशीत असताना चैत्र व वैशाख महिन्यात संपूर्ण देशात विवाह होऊ शकतील, असे दाते यांनी सांगितले. नवांश काळाप्रमाणेच मे २०१६ ते जून २०१६ कालावधीत शुक्रास्त असल्याने या कालावधीत मंगलकार्ये नाहीत, असे दाते यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, नगरसेवक प्रमोद चोथवे, मनोज भगत, डॉ. रामराव हरदास, डॉ. संजय रत्नाकर, मनोज खेडलेकर, भूषण रत्नाकर उपस्थित होते.

भाैगाेलिकदृष्ट्या मुहूर्त असे
भौगोलिकदृष्ट्या नाशिक शहर व ग्रामीण भागाची उत्तर-दक्षिण अशी विभागणी असल्याने िजल्ह्यातील मुहूर्तांमध्ये वेगळेपण आहे. नवांश समाप्तीनंतर गोदावरीच्या दक्षिणेकडील शहरात सीबीएस, द्वारका, सिडको, नाशिकरोड, इगतपुरी, सिन्नर भागात मंगलकार्ये होतील.

राज्यातील मुहूर्त असे
नवांश समाप्तीनंतर नोव्हेंबर महिन्यापासून गोदावरीच्या दक्षिणेकडील मुंबई, पुणे, संगमनेर, अहमदनगर, श्रीरामपूर, नाशिकचा पश्चिम-दक्षिण भाग, परळी-वैजनाथ, सोलापूर, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे मंगलकार्ये होतील.