आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासनाच्या उद्याेग प्राेत्साहन अनुदान निर्णयात नाशिकला ठेंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वीजदर सवलतीत उत्तर महाराष्ट्राची बाेळवण केल्यानंतर याबाबतचा वाद ताजा असतानाच अाता राज्य सरकारने विदर्भ व मराठवाड्यातील विशाल अतीविशाल उद्याेगांना अाैद्याेगिक विकास अनुदान देण्याबराेबरच अनुदान प्राप्त करण्याची कालमर्यादाही वाढविल्याची बाब समाेर अाली अाहे. मार्च महिन्यातच सरकारने याबाबतचा अादेश काढला असून, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार अाणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश या अनुदान धाेरणात केला अाहे. असे असले तरी नाशिकचा यात समावेश करण्यात अाल्याने येथे माेठे उद्याेग येण्याची वाट अाणखी बिकट हाेणार असल्याची भीती व्यक्त हाेत अाहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार, राज्यात अाैद्याेगिक विकासाचा दर वाढवून राज्याच्या अाैद्याेगिक वाढीत क्षेत्रीय समताेल सर्व समावेशक विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येऊन मार्च २०१६ राेजी राज्य सरकारच्या उद्याेग, ऊर्जा कामगार विभागाने एक अादेश काढला हाेता. त्यात, मराठवाडा विदर्भातील विशाल अतीविशाल प्रकल्पांना १०० टक्के ग्राॅस व्हॅटवर अाधारित अाैद्याेगिक विकास अनुदान उपभाेगण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला गेला. यातील तरतुदींनुसार मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जिल्हे तसेच काेकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे स्थापन हाेणाऱ्या विशाल अतिविशाल उद्याेगांना १०० टक्के ग्राॅस व्हॅट अाधारित अाैद्याेगिक प्राेत्साहने देण्यात येत अाहेत.

यात नव्याने २२ सप्टेंबर २०१६ राेजी नवीन अादेशही काढण्यात अाला अाहे, मात्र या निर्णयात नाशिक जिल्ह्याचा समावेश नाही. समावेशासाठी जिल्ह्यातील बहुतांश ‘डी’ झाेनमध्ये असलेल्या अाैद्याेगिक वसाहती ‘डी प्लस’ झाेनमध्ये परावर्तीत करण्यात याव्यात, याकरिता प्रयत्न करण्याची गरज अाहे.

शुक्रवारी चर्चा अपेक्षित
नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या (निमा) पुढाकाराने अाैद्याेगिक विकासाच्या उद्देशातून विधानसभा विधानपरिषदेच्या जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी (दि. ३०) बाेलाविली अाहे. या बैठकीत वरील मुद्द्यावर चर्चा अपेक्षित अाहे.

याबाबत विचार अावश्यक
शासनाच्याया निर्णयाच्या प्रस्तावनेत मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकाेणाबाहेर मराठवाडा विदर्भाची तसेच उत्तर महाराष्ट्रातील काेकणातील काही क्षेत्रात अद्यापही अाैद्याेगिक विकासाची गती व्याप्ती अल्प असल्याचे स्पष्ट करण्यात अाले अाहे. मुळात नाशिक जरी सांगायला सुवर्णत्रिकाेणात असले तरी मुंबई अाणि पुणे किंवा मराठवाड्यातील अाैरंगाबाद किंवा विदर्भातील नागपूरपेक्षा अल्प उद्याेग येथे अाहेत. याचाही विचार सरकारने करणे अपेक्षित हाेते.
बातम्या आणखी आहेत...