आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांवर अाता दिवसाअाड पाणीपुरवठा बंदचे संकट गडद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर नाशिककरांना मुबलक पाणी देण्याचा दावा करणाऱ्या पालकमंत्र्यांपासून भाजपच्या अामदारांनाच अाराेपीच्या पिंजऱ्यात उभी राहण्याची वेळ महापालिका जलसंपदा खात्याच्या संयुक्त अहवालामुळे अाली अाहे. मे महिन्यानंतर दिवसाअाड शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यापर्यंत वेळ गेल्याची भीती महासभेत पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी व्यक्त केली.
एवढेच नव्हे, तर इतिहासात प्रथमच गंगापूर धरणाच्या तळाकडील पाणी उचलण्याची वेळ अाली असून, संबंधित बाब अत्यंत अशक्यप्राय असली तरी प्रयत्न करण्याशिवाय हातात काहीच शिल्लक नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, महासभेने पाणीकपातीबाबत उगाच राजकारण नकाे म्हणून निर्णयाचे सर्वाधिकार अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना सुपूर्द केले.

गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर पालकमंत्र्यांपासून भाजप नेत्यांनी एकाच सुरात नाशिककरांना पाण्याची वणवण हाेऊ देणार नाही, असे निक्षून सांगितले हाेते. मात्र, पाण्याचे नियाेजन करणाऱ्या पालिकेला राजकीय उत्तरामुळे निर्माण हाेणारी भीषण स्थिती टाळता येणार नसल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी कपात गरजेची असल्याचे वारंवार पटवून दिले. महासभेने त्यानुसार अाठवड्यातून एक दिवस पाणी बंदचे अादेश दिले. प्रारंभी भाजपच्या प्रभावामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही. मात्र, टंचाईचे चटके बसू लागल्यावर प्रशासनाने दबाव झुगारून एक दिवस पाणी बंदचा निर्णय घेतला. दरम्यान, मार्च महिन्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर महापाैरांना एक पत्रही दिले. यात अत्यंत धक्कादायक धाेक्याची घंटा वाजवणारी परिस्थिती तर उघड झालीच, मात्र सत्ताधारी भाजपचे मुबलक पाण्याचे पितळही उघडे पडले. त्यासंदर्भात महासभेत जाेरदार चर्चा झाल्यानंतर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी पाणीकपातीबाबत येत्या काळात अाठवड्यातून दाेन वा तीन दिवस कपातीचा निर्णय घेण्याची वेळ येणार असल्याकडे लक्ष वेधले. पाण्याची बचत करणे उधळपट्टी करणाऱ्यांचे प्रबाेधन करण्याची गरज व्यक्त करीत कपातीचे अधिकार अायुक्तांना साेपवले. मात्र, कपातीचा कालावधी साेडून उर्वरित दिवस पूर्णक्षमतेने, पूर्णदाबाने पूर्ण वेळेत पाणी द्यावे, असेही अादेश त्यांनी दिले. याबराेबरच सहा विभागांत प्रत्येकी दाेन गरज भासल्यास अतिरिक्त एक टँकर वाढवून द्यावा, असेही अादेश महापाैरांनी दिले.

जलसंकटाच्या दिशेने असा प्रवास
यात१९ फेब्रुवारी २०१६ राेजी जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी केली. गंगापूर धरणात सद्यस्थितीत ६०३ मीटर पाणी शिल्लक असून, ५९८ मीटरखाली पाणी उचलणे शक्य हाेणार नाही. फुटांचा विचार केला तर पावसाळ्यानंतर ५७ फूट पाण्याची क्षमता असलेल्या गंगापूर धरणात सद्यस्थितीत २६ फूट पाणी शिल्लक अाहे. १५ ते ३० मे या कालावधीनंतर १० फूट इतकेही पाणी शिल्लक राहणार नाही. तळापर्यंत प्रथमच अारक्षित केलेले हे पाणी उचलणे म्हणजे माेठी कसाेटीच असल्याचे पवार यांनी लक्षात अाणून दिले. यापूर्वी कितीही पाणीबाणीची परिस्थिती अाली तरी गंगापूर धरणात ३०० ते ३५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक ठेवले जात हाेतेे. अाजघडीला जॅकवेलच्या खाली पाणीपातळी जाणार असल्यामुळे गढूळ घाणमिश्रित पाणी कसे उचलायचे, असे यक्षसंकट उभे ठाकले अाहे. असे पाणी उचलण्याची तयारी केली तर जलशुद्धीकरण यंत्रणांची कार्यक्षमता कमी हाेण्याची किंबहुना ठप्प हाेण्याची भीती अाहे.

असा अाहे अाता उपाय
गंगापूरधरणातील जॅकवेलच्या सहा फुटांखाली पाणी गेले की उचलणे मुश्कील अाहे. अशा परिस्थितीत प्रतिदिन ३३० दशलक्ष लिटर पाणी उचलणे तर साेडा, जेमतेम २०० ते १५० दशलक्ष लिटर पाणी उचलता येईल, असे पवार यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मृत पाणीसाठा (डेड वाॅटर) जॅकवेलपर्यंत अाणण्यासाठी चारी खाेदून इंटेकवेलपर्यंत काही उपाययाेजना कराव्या लागतील. त्यासाठी महापालिकेने निविदा काढली अाहे. पर्यायी पाणी स्रोत म्हणून नवीन विंधन विहिरी, खासगी विहीर अधिग्रहण, टँकर, हात वीजपंप सुरू करणे अशी कामे हाती घेतली जाणार अाहेत. जॅकवेलपर्यंतच्या चारीचे रुंदीकरण करावे लागेल, तरच ३१ जुलैपर्यंत पाणी पुरू शकेल. अायुक्त डाॅ. गेडाम यांनी गंभीर परिस्थिती लक्षात घेत ३१ जुलै काय, परंतु १५ अाॅगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियाेजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

भाजपचे हवेत बाण, विराेधक बचतीवर ठाम
गंगापूर धरणात इतिहासात प्रथमच मृत पाणीसाठा वापरण्यापर्यंत संकट अाल्याचे प्रशासनाने मांडल्यावर भाजपचे गटनेते संभाजी माेरूस्कर यांनी पुन्हा घासूनफुसून गुळचट झालेल्या पाणीगळती राेखण्याचा राग अाळवला. सर्वप्रथम तर त्यांनी विषयाची माहितीच नसल्यामुळे बाेलण्यात अर्थ नसल्याचे सांगितले. सरतेशेवटी यापूर्वी ठेंगा दाखवला असताना पुन्हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाढीव पाणी देण्याचा निर्णय घेऊ, असा अाशावाद व्यक्त केला. त्यावर सभागृहात हशा पिकल्यानंतर शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी माेरूस्कर यांचा अाशावाद अभिनंदनीय असल्याचा चिमटा घेतला. अाता प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे कसे नियाेजन करायचे हे ठरवावे, असे सांगितले. उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी प्रसंगी दाेन काय तीन दिवस पाणी बंद ठेवा, मात्र जाे वेळ पुरवठ्यासाठी द्याल त्यात पूर्णक्षमतेने तळाला पाणी द्यावे, अशी सूचना केली. प्रतिदिन ३७० दशलक्ष लिटर पाणी उचलले तरच तळाला पाेहोचेल, असेही त्यांनी सांगितले. सुधाकर बडगुजर यांनी २०१२-१३ मध्ये पाणीटंचाई उद्भवल्यावर जॅकवेलजवळ कशा पद्धतीने चारी रुंद केली इंटकवेलपर्यंतची कामे कशी केली, याचे अनुभव सांगून प्रशासनाने अाता पावले उचलली तर टंचाईवर मात करता येईल, याकडे लक्ष वेधले. दरम्यान, राहुल दिवे, सुजाता डेरे, शिवाजी गांगुर्डे, उद्ध्‍व निमसे, संजय चव्हाण, वत्सला खैरे, रंजना पवार, रत्नमाला राणे, शाहू खैरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी पाणीकपात वाढवण्याला विराेध करीत पर्यायी उपाय याेजनांबाबत सूचना केल्या.
बातम्या आणखी आहेत...