आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी फटाक्यांची दुकानांत ‘लड’; प्रतिसाद मात्र ‘फुसका’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बेडका सारखाउड्या मारणारा जंपिंग जॅक... हेलिकाॅप्टरच्या पंख्याप्रमाणे फिरत जाणारे म्युझिकल क्रॅकर... जुन्या हंड्यांप्रमाणेच, पण कागदापासून तयार झालेले सप्तरंगी झाड...तब्बल ३० सेंटिमीटर इतकी लांबसडक असलेली सुरसुरी असे नवे पाहुणे यंदा फटाक्यांच्या दुकानात अवतरले अाहेत. यंदा ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांना फाटा देण्यात येत असून, फॅन्सी अॅटमची सर्वाधिक चलती असल्याचे दुकानदार सांगतात. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फटाका विक्रीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत अाहे. 
 
दिवाळीची सुरुवात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या स्वागताने झाली अाहे. त्यासाठी ठिकठिकाणी दुकाने सजली अाहेत. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे कानठळ्या बसविणाऱ्या श्वास घेण्यासही अडचण हाेईल इतका धूर फेकणाऱ्या फटाक्यांची खरेदीच करण्यावर दुकानदारांनी भर दिला अाहे. अावाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी फटाक्यांना मागणी वाढल्याने तसा माल भरण्यात अाला अाहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर हाेईलच; शिवाय कायद्याचेही उल्लंघन हाेणार नाही. 
 
हे अाहेत नवीन फटाके 
हेलिकाॅप्टरच्या पंख्यासारखे जमिनीपासून फिरत जाणाऱ्या क्रॅकरमधून संगीताची धून एेकू येते. बेडकासारख्या टुणटुण उड्या मारणाऱ्या जंपिंग जॅकचीही चांगलीच चलती अाहे. पूर्वी मातीच्या हंडीत फुलझाड उपलब्ध हाेत. हीच डिझाइन कायम ठेवत मातीच्या हंडीएेवजी कागदाच्या हंडी तयार करण्यात अाल्या अाहेत. त्यातून हाेणारी रंगांची बरसात नियमित झाडापेक्षा कैकपटीने माेठी असते. यापूर्वी सर्वाधिक लांब सुरसुरी ३० सेंटिमीटरची हाेती. यंदा मात्र ही सुरसुरी ५० सेंटिमीटरच्या लांबीत उपलब्ध अाहे. लाल किंवा हिरव्या रंगात फिरणाऱ्या भुईचक्राची मजा सर्वांनीच घेतली अाहे. परंतु, यंदा रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे हे चक्रही फिरताना रंग बदलणार अाहे. यापूर्वी प्रत्येकी स्वतंत्र पाच रंगात सुरसुऱ्यांचे बाॅक्स उपलब्ध हाेते. यंदा मात्र एकाच बाॅक्समध्ये पाच रंगाच्या सुरसुऱ्या उपलब्ध झाल्या अाहेत. 
 
चायनीज फटाके अधिक ठरताहेत धाेकेदायक 
फटाक्यांमध्ये यंदा वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध अाहेत. प्रदूषण कमीत कमी हाेईल यासाठी संबंधित कंपन्यांनी भर दिलेला दिसताे. चायनीज फटाके मात्र अाम्ही काेणीही विकत नाही. नागरिकांना सर्वाधिक धाेका हा चायनीज फटाक्यांमुळेच असताे. 
- दिनेश चव्हाण, फटाके विक्रेता 
 
यंदाचे फटाके प्रदूषणविरहितच 
शाळांमध्ये फटाक्यांविराेधात घेण्यात अालेल्या शपथ अाणि विविध संस्थांतर्फे प्रदूषणाबाबत करण्यात अालेली जागृती यामुळे यंदा फटाके विक्रीला अतिशय अल्प प्रतिसाद अाहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या निकषाप्रमाणेच फटाक्यांची निर्मिती करण्यात अालेली अाहे. त्यामुळे हे फटाके प्रदूषणविरहितच म्हणता येतील. 
- अमाेल बर्वे, फटाके विक्रेता 

अावाजासह रंगीत धूर फेकणारे फटाके 
लहान मुलांना अाकर्षित करण्यासाठी यंदा छाेटा भीम, डाेरेमाॅन या प्रकारच्या सुरसुऱ्या बाजारात अाल्या अाहेत. तर, स्पायडर मॅनसारखे वेगाने पुढे सरकणारे फॅन्सी राॅकेट, सायरनचा अावाज असलेल्या सुरसुऱ्याही बाजारात उपलब्ध अाहेत. बाॅम्बे नाइट, चारही बाजूने फिरणारे स्वस्तिक व्हील, नवरंगी फ्लाॅवर पाॅट, रंग बदलणारे बटरफ्लाय, २५ रंग अाणि अावाजाचा उडणारा फटाका या नवीन बाबी बाजारात दाखल झाल्या अाहेत. याशिवाय, ‘कलर बुस्ट’, ‘एके-४७’ तसेच ‘म्युझिक’ असलेल्या फॅन्सी फटाक्यांचा ‘आवाज’ दिवाळीत राहणार आहे. सध्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या फटाका स्टॉलमध्ये यंदा आवाजासह रंगीत धूर फेकणारे ‘कलर बुस्ट’ तसेच पाच रंगांच्या प्रकाशाची उधळण करणारे वंडर अनार, सिल्व्हर रेन, रेल्वेचा आवाज करणारे रेल्वे सिग्नल, उंच जाऊन आकाशात विविध रंगांमध्ये फुटणारे सेव्हन शॉट, बारा आवाजी रोज गार्डन, शिटीसारखा आवाज करणाऱ्या फटाक्यांना पसंती मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...