आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Safety Measures For Pedestrian And Vehicles Crossing Roads

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काळजीपणा: चौफुल्या ठरतात पादचार्‍यांसाठी धोकेदायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- के. के. वाघ कॉलेजबाहेर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली नसल्याने या दुष्टचक्रातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना नाकीनऊ येते; परंतु त्यापुढील भागांची अवस्थाही फारशी चांगली नाही. विडी कामगारनगर चौफुली, रासबिहारी शाळा चौक, हॉटेल जत्रासमोरील चौफुली या भागात रस्ता ओलांडणार्‍या वाहनचालकांच्या व पादचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या परिसरातून मार्गक्रमण करणे म्हणजे सध्या प्रचंड जिकिरीचे ठरत आहे.

महामार्गावरच थांबतात रिक्षा

के. के. वाघ कॉलेज, विडी कामगारनगर व रासबिहारी चौक व हॉटेल जत्रा चौकात महामार्गावरच रिक्षा थांबतात. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. सर्व्हिसरोडवर बसथांबा नसल्यामुळे प्रवासी महामार्गावर येतात आणि या प्रवाशांसाठी रिक्षाही मग महामार्गावरच उभ्या राहतात. त्यामुळे सर्व बसथांबे सर्व्हिसरोडवर होणे गरजेचे आहे. तसेच महामार्गावर रिक्षा थांबवण्यासही मज्जाव घालण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

काय आहे ही वाहतुकीची समस्‍या? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...