आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकडे ‘तत्काळ’, इकडे दुष्काळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रेल्वे प्रशासन व पोलिसांच्या कृपेने तत्काळ तिकिटांची सोय एजंटांपुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. या आरक्षणासाठी 16-16 तास रांगेत ताटकळल्यानंतरही सामान्य प्रवाशांचा खिडकीपासून ‘दुसरा’ क्रमांकच ठरलेला असतो. मध्यरात्रीच काय, आदल्या दिवशी दुपारी जाऊनही पहिला क्रमांक बहुतांशीयेतच नाही. काय आहे यामागचे कारण? नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील हा लाइव्ह रिपोर्ट.


तत्काळ आरक्षणासाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर प्रवाशांची भली मोठी रांग होती. काही महिलाही होत्या. पावणेआठच्या सुमारास कार्यालयाचे शटर उघडले, तेव्हा एका रेल्वे पोलिसाने तीन रांगा लावल्या. त्यात एक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दुसरी महिलांसाठी होती. तिसरी सामान्यांसाठी. वरवर पाहता हे सारे काही नियमानुसारच होत असल्याचे भासेल; पण बारकाईने लक्ष ठेवले तेव्हा समजले की, रेल्वे पोलिसाने मुख्य शटर उघडले जात असताना तीन रांगा करण्याच्या बहाण्याने एजंटाच्या पंटरची बेमालूमपणे तिन्ही रांगांच्या पहिल्या क्रमांकावर उभे राहण्याची व्यवस्था केली.सामान्य प्रवाशांना एकच अर्ज देण्याचा नियम असताना पहिल्या क्रमांकावरील ‘प्रवाश्या’ने दोन अर्ज तिकीट खिडकीतून पुढे सरकवले व गंमत म्हणजे ‘आतून’ त्याला कोणताही आक्षेप न घेता ‘तत्काळ’ तिकिटे देण्यात आली. हे पाहून जवळचा प्रवासी म्हणाला, ‘‘काल दुपारी चार वाजेपासून रांगेत उभा आहे, तरी तिसरा क्रमांक लागला आहे. तब्बल एक दिवस अगोदर येऊनही तिकिटाची शाश्वती नाही.’’ दुसरा म्हणाला, की तो पहाटे चार वाजता आलाय, तिकिटाची गॅरंटी अर्थातच नाही. आम्ही जे पाहिले, ते त्यांना नेहमीचेच. काही मिनिटांत तिकिटे संपली. रात्रभर जागरण करूनही रिकाम्या हातीच बहुतांश मंडळी घराकडे निघाली.. आजूबाजूला कोणी एजंट दिसतो का याचा शोध घेत...


तत्काळची ‘शाळा’
आरक्षण कार्यालयाबाहेर आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार उघडल्यानंतर आतमध्ये रोज असे शेकडो प्रवासी तत्काळ तिकीट मिळण्याच्या आशेने तासन्तास असे शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे शिस्तबद्धपणे बसलेले असतात;
पण...


पोलिसांची दादागिरी
तत्काळ आरक्षणासाठी सोमवारी सायंकाळी चारपासूनच येऊन बसलो आहे. तरीही माझा दुसरा क्रमांक आहे. पोलिसांच्या दादागिरीमुळे माझा नंबर मागे गेला आहे.
राकेशकुमार पटेल, प्रवासी


... तरीही शंकाच आहे
पहाटे साडेतीन वाजता आलो आहे. कार्यालयाच्या बाहेरच झोपलो. तत्क ाळ आरक्षणासाठी तीन रांगा असूनही चौथा क्रमांक लागला. तरीही तत्काळ तिकीट मिळेल की नाही, याची शंकाच आहे.
हॅपी भारद्वाज, प्रवासी