आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ काळात नाशिकवरून गाड्यांचे अारक्षण बंद करावे, विभागीय आयुक्तांच्या रेल्वेला सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव संजीवकुमार, भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त डवले नाशिकराेड रेल्वे स्थानकावरील कामांची पाहणी करताना. - Divya Marathi
रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव संजीवकुमार, भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त डवले नाशिकराेड रेल्वे स्थानकावरील कामांची पाहणी करताना.
नाशिकराेड - कुंभमेळा कालावधीत भाविकांच्या प्रवासासाठी रेल्वेचे नियाेजन पुरेसे नसल्याने रेल्वेने स्पेशल गाड्यांची संख्या वाढवावी, पर्वणीच्या दिवशी, अगाेदर नंतरच्या दिवसापर्यंतचे अारक्षण बंद करून फेरनियाेजनच्या सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात अाल्या. रेल्वेचे अधिकारी अाढावा बैठकीत राहात नसल्याची प्रशासनाची तक्रार हाेती. रेल्वेच्या नियाेजनाच्या माहितीपासून प्रशासन अनभिज्ञ हाेते. शुक्रवारी रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव कुमार, भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या अाढावा बैठकीत प्रशासनाने रेल्वे प्रशासनाचे उट्टे काढले. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन, मनपा अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा अायुक्त चंद्रमाेहन मिश्र उपस्थित हाेते. पर्वणीत अधिक गाड्यांची व्यवस्था करावी गाड्यांना जास्त डबे जाेडण्यात यावेत, त्यादिवशी दुपारी १२ वाजेनंतर पुढील ६० तासांसाठी नाशिकहून जाणाऱ्या गाड्यांचे अारक्षण थांबविण्याच्या सूचना विभागीय महसूल अायुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या. रेल्वे मंत्र्यांचे खासगी सचिव संजीव कुमार यांनी रेल्वे इंजिनची दिशा बदलण्याच्या वेळेत बचत व्हावी, गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी डिझेल, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिटच्या वापराच्या नियाेजनाचा विचार करण्याची सूचना केली.

रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव संजीवकुमार, भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त डवले नाशिकराेड रेल्वे स्थानकावरील कामांची पाहणी करताना.

महाव्यवस्थापकांचा दुसऱ्यांदा दाैरा रद्द
कुंभमेळ्याच्याविकासकामांच्या पाहणीसाठी येणारे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सुद यांचा अाठवड्यात दुसऱ्यांदा नियाेजित दाैरा रद्द झाल्याने ते अाता साेमवारी नाशिकराेडला येणार आहेत. चार दिवसांपूर्वी महाव्यवस्थापक दाैरा एेनवेळी रद्द झाला हाेता. मुसळधार पावसामुळे त्यांना मुंबईबाहेर पडणे अशक्य झाल्याने त्यांचा दाैरा रद्द झाला.

अतिरिक्त गाड्या अशक्य
मनमाडस्थानकावरून दिवसाला अप-डाऊन १२७ गाड्या धावतात. त्यामुळे मनमाड येथून अतिरिक्त गाडी साेडणे अशक्य असल्याचे भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले.

विकास कामांची पाहणी
रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव संजीवकुमार, भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांनी सकाळी रेल्वे स्थानकावरील विकासकामे, सीसीटीव्ही, निवारा शेड अादी महत्त्वाच्या कामांची पाहणी केली.

शिर्डीसाठी विशेष गाडीचा विचार
सिंहस्थातशिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असणार असल्याने शिर्डी-दाैंड विशेष गाडी साेडण्याबाबत विचार सुरू असून, सिंहस्थात १२ अतिरिक्त गाड्या चालविण्याच्या निर्णयाची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पालकमंत्र्यांच्या प्रश्नांवर चर्चा
पालकमंत्रीमहाजन यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केले हाेते. त्यात अारक्षणाची सुविधा नाशिकवरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी करणे शक्य अाहे का? रेल्वे गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवणे शक्य आहे का? अादी विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
बातम्या आणखी आहेत...