आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो हज यात्रेकरूंना अजून व्हिसा मिळाला नाही, संगणकीय प्रणालीत गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सद्वारे यंदा सौदी अरेबियातील पवित्र मक्का शरीफ येथे हज यात्रेला जाऊ पाहणारे राज्यातील शेकडो यात्रेकरू यंदाच्या यात्रेला मुकणार की काय, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या एजंटांना अद्याप सौदी अरेबियाकडून व्हिसा मिळालेला नाही. तसेच हज कमिटीकडूनही जाणाऱ्या यात्रेकरूंना अद्याप व्हिसा मिळालेला नसल्याने त्यांच्याही जाण्याच्या तारखा रखडल्या आहेत. त्यामुळे हजची सर्व तयारी पूर्ण केलेल्या यात्रेकरूंमध्ये चिंतेचे वातावरण आहे.   
 
देशातील अधिकृत हज कमिटीद्वारे हजला जाणे आता सुखकर व सुरक्षित मानले जात आहे. मात्र, हज कमिटीद्वारे हजचा नंबर न लागलेल्या यात्रेकरूंना खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सने विविध आमिषे दाखवून आकर्षित केले. त्यानंतर ऐनवेळी त्यांचा कोटा कमी होतो किंवा व्हिसा नाकारला जातो. त्यामुळे हज यात्रेकरूंना यात्रेला मुकावे लागते.

यंदा असा काही प्रकार होऊ नये यासाठी हज यात्रेच्या पंधरा दिवस अगोदरच यात्रेकरूंकडून खबरदारी घेतली जात आहे. येत्या २ सप्टेंबरला हज यात्रा होणार आहे. यासाठी देशभरातून आतापर्यंत एक लाखहून अधिक यात्रेकरू रवाना झाले आहेत. नाशकातील खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सकडून अनेक यात्रेकरू पवित्र मक्का शरीफ येथे पोहोचले आहे. तर काहींचा व्हिसा अद्याप आला नसल्याचे ट्रॅव्हल्सकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर हज कमिटीद्वारे हजला जाणाऱ्यांचेदेखील यंदा सौदी अरेबियाकडून अद्याप व्हिसा आला नसल्याने त्यांच्याही तारखा रखडल्याचे चित्र आहे.

‘ई-पाथ’ संगणकीय प्रणालीत गोंधळ
हज कमिटी इंडियामार्फत एक लाख २० हजार, तर खासगी टुर्स कंपनीमार्फत ३६ हजार भाविक जाणार आहेत. मात्र, हज कमिटीकडून सर्व आवश्यक कागदपत्रे पाठविण्यात आली असताना, सौदी हज मंत्रालयाने या वर्षापासून व्हिसासाठी बनविलेल्या ‘ई-पाथ’ संगणकीय प्रणालीतील गोंधळ झाल्यामुळे व्हिसा येण्यास उशिर होत असल्याचे चित्र आहे. लवकरात लवकर व्हिसा मिळविण्यासाठी हज कमिटीकडून प्रयत्न केले जात असल्याचे हज समन्वयक हाजी जहीर शेख यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...