आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पाणी नाही; डीएमआयसी औरंगाबादला गेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या (डीएमआयसी) विद्यमान टप्प्यात नाशिकला वगळण्यात आले असून, या टप्प्यात शेंद्रा-बिडकीनची निवड झाली, असा गौप्यस्फोट एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी शुक्रवारी केला.

डीएमआयसीच्या नकाशावर नाशिक दोनदा आले आणि गायब झाले यावर उद्याेजकांनी स्पष्टीकरण मागितले. तेव्हा गगराणी यांनी हा खुलासा केला. जलसंपदा विभागाने या प्रकल्पांतर्गत येणा-या उद्याेगांकरीता नाशिकमध्ये पुरेसे पाणी नसल्याचा अहवाल दिल्यानंतर शेंद्रा-बिडकीनची निवड डीएमआयसीच्या टप्प्यात केली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.