आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन नाशिक’साठी नाेडल अाॅफिसर नियुक्त, पालकमंत्र्यांकडून अाढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुंबईत हाेत असलेल्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाच्या अायाेजनाकरिता राज्य सरकारकडून नाेडल अाॅफिसर (प्राधिकृत अधिकारी) म्हणून उद्याेग मंत्रालयाचे अतिरिक्त संचालक विकास जैन यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. याशिवाय शासकीय स्तरावर या उपक्रमाचे संयाेजन बघण्यासाठी मार्केटिंग अधिकारी पंकज मानकामे यांची नियुक्ती करण्यात अाली. 
 
यापूर्वी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शविलेल्या कंपन्यांना विशेष अामंत्रित करण्यासह विविध देशांचे दूतावास, माेठ्या कंपन्या, काॅर्पाेरेट ग्रुप यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रालयात उद्याेगमंत्री सुभाष देसाई अाणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उद्याेजक, लाेकप्रतिनिधींसाेबत घेतलेल्या बैठकीत घेण्यात अाला. 
 
‘मेक इन नाशिक’ हा उपक्रम ३० ३१ मे राेजी मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटर येथे हाेत अाहे. ताेंडावर अालेल्या या उपक्रमाची अाढावा बैठक बुधवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबईतील ‘शिवनेरी’ या शासकीय निवासस्थानी झाली. पालकमंत्री महाजन, खासदार हेमंत गाेडसे, उपक्रमाचे चेअरमन निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणीस उदय खराेटे, चिटणीस ज्ञानेश्वर गाेपाळे, एमअायडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा उद्याेग केंद्राचे सहसंचालक बी. एस. जाेशी अादी बैठकीला उपस्थित हाेते.
 
या उपक्रमाची प्रसिद्धी राज्याच्या माहिती प्रसारण विभागाकडून करण्यासह उद्याेगमंत्री पालकमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच पत्रकार परिषदेचे अायाेजन करण्याचा निर्णय घेण्यात अाला. यावेळी खासदार हेमंत गाेडसे यांनी अंबड अाैद्याेगिक वसाहतीतील अायटी पार्क इमारतीचे भाडे कमी ठेवून स्टार्टअप उद्याेजकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली असता याचा तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्याेगमंत्री देसाई यांनी एमअायडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. विजेची सवलत अाणि मेगा प्राेजेक्टची सवलत नंदुरबार अाणि अाैरंगाबादमध्ये असलेले अनुदान नाशिक जिल्ह्यातील अादिवासीबहुल तालुक्यांतही लागू करावी, या उद्याेजकांनी केलेल्या मागणीला उद्याेगमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, पुढील अाठवड्यात पुन्हा एक बैठक घेतली जाणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...