आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअरमध्येही अप्रमाणित काश्‍मीरचा नकाशा!,

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दहावी भूगोलाच्या पुस्तकातील नकाशामधून अरुणाचल प्रदेश वगळल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिक्षकांसाठी दिलेल्या एका सॉफ्टवेअरमधील नकाशातूनही काश्मीरचा काही भाग वगळण्याचा पराक्रम शिक्षण विभागाने केला आहे.


एकीकडे अखंड भारतासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असताना महाराष्टÑ राज्याचा शिक्षण विभाग देशाच्या नकाशातून एकेक भाग गायब करत असल्याचे समोर येत आहे. पुस्तकांमधून अरुणाचल प्रदेश, काही बेटे, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग वगळण्याचा बेजबाबदारपणा संयोजकांनी केला होता. पण, आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षकांना दिलेल्या ओपन टीचर सॉफ्टवेअरमधील टोपोग्राफी नेव्हिगेशनमधील भारताच्या नकाशातून काश्मीरचा काही भाग चीनमध्ये दाखवल्याचे समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आता सॉफ्टवेअरचा वापर होणार आहे. पण, पुस्तकात एक आणि सॉफ्टवेअरमध्ये दुसरा नकाशा असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकही संभ्रमात आहेत.


शिक्षकांकडे दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारे (वलयांकित) चुकीचा नकाशा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता शिक्षकांच्या लक्षात आले नाही आणि त्यांनी आहे तसेच भारताचे चित्र उभे केले तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होईल. त्यांच्या मनातही असेच चित्र तयार होईल.
विनोद पानसरे, न्यू इंग्लिश स्कूल, बारागावपिंप्री