आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयदेव-उद्धव ठाकरे यांच्या भांडणात ओढू नका, राज यांनी वादात जाहीर भूमिका घेणे टाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जयदेव व उद्धव ठाकरे यांच्या भांडणात मला अाेढू नका. माताेश्रीवरील भेटीविषयी काहीच बाेलणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी या वादात जाहीर भूमिका घेणे टाळले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले. जयदेव यांनी ठाकरे घराण्यातील वादासंदर्भात राज यांनी केलेल्या जाहीर वक्तव्याच्या ध्वनिफिती न्यायालयासमाेर सादर केल्याच्या अनुषंगाने तुम्हाला न्यायालयात बाेलावणे येऊ शकते यावर विचारले असता त्यांनी न्यायालयात जाण्याची नेहमीच सवय असून तसे बाेलावणे अाले तर जाईन अशी भूमिका मांडली. ठाकरे घराण्यासंदर्भात यापूर्वी केलेल्या वक्तव्यावर अापण ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र विदर्भ वा अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनात गाेंधळ घालण्याचे सत्ताधारी व विराेधकांचे तंत्र निव्वळ सरकारच्या ‘प्राधान्याचे’ विषय मंजुरीसाठी हाेते. या तमाशात लाेकांची दिशाभूल करणारे दुपारी जेवणाच्या सुटीत एकमेकांचे डबे अानंदाने खात हाेते, असा गंभीर अाराेप राज यांनी केला. महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मनसे ठाम असून वेळ अाल्यानंतर याेग्य उत्तरही दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस विरोधकाच्याच भूमिकेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.
पुढे वाचा.... मुळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा विधिमंडळात अालाच काेठून... ब्रिटिशांना जाणीव, पण अापले झाेपेत