आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढे तरुणांच्या पार्ट्यांना परवानगी नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - त्र्यंबकेश्वरजवळील ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये तरुणांच्या पार्ट्यांना यापुढे परवानगी दिली जाणार नाही. झालेल्या प्रकाराबद्दल व्यवस्थापन दिलगिरी व्यक्त करत असल्याचे पत्रक शुक्रवारी व्यवस्थापनातर्फे काढण्यात आले.
या रिसॉर्टमध्ये गुरुवारी पूल पार्टीच्या नावाखाली झालेली पाण्याची उधळपट्टी व धांगडधिंग्याबाबत ‘दिव्य मराठी’ने 29 मार्चच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. ऐन दुष्काळात झालेल्या पाण्याच्या नासाडीकडे लक्ष वेधल्यानंतर रिसॉर्ट व्यवस्थापनाने याबाबत एका पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


‘एका इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपने रिसॉर्टमध्ये कॉलेज युवकांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही युवकांच्या पार्ट्यांना परवानगी देत नाही. मात्र युवकांनी आपले जुने कपडे, पुस्तके, आम्ही परिसरातील गरजूंना वाटप करणार असल्याचे सांगितल्याने आम्ही कार्यक्रमाला होकार दिला. हा कार्यक्रम गेट टुगेदर असल्याचे इव्हेंट ग्रुपने आम्हास लेखी दिल्यामुळे आणि पोलिस परवानगीही सादर केल्यानंतरच आम्ही परवानगी दिली. मात्र काही उत्साही तरुणांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर आम्ही तातडीने गेट टुगेदर गुंडाळावयास लावले,’ असे रिसॉर्ट व्यवस्थापनाने म्हटले आहे.