आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - मराठा आरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संघटनांनी केवळ घोषणाबाजी आणि जयघोष न करता, नेमके आरक्षण कशासाठी आणि कसे हवे आहे, याचा एक आराखडा तयार करावा. बौद्धिक पातळीवर सरकारसोबत भांडत कागदोपत्री हा मुद्दा पटवून द्यावा, असा सल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला.
छावा संघटनेच्या वतीने रविवारी मराठा आरक्षण व नचिअप्पन अहवालावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवादात ते बोलत होते. मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या मागणीत आणि त्याच्या मान्यतेत बहुजन समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन भोसले यांनी केले. तसेच, राज्यात कोणाच्या कोट्यातून नव्हे, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे, या मुद्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मेटेंना निरोप देणार
शिवसंग्राम आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी आमदार विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून वाद झाला. त्यावर छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावर संभाजीराजे यांनी, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा रक्ताबरोबरच विचारांचाही वंशज असल्याने कायदा हातात घेणार नाही. मात्र, जो कोणी कायदा हातात घेईल त्याला मात्र सोडणार नसल्याचे त्यांनी मेटेंचा नामोल्लेख टाळत सांगितले. मात्र त्यांना याबाबत निरोप पाठविणार असल्याचेही ते म्हणाले.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे वंशज सत्यजित गायकवाड यांना यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.