आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकशाही व्यवस्था बळकट करेल ‘नापसंतीचे मत’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  २६/११ च्या घटनेनंतरअत्यंत बाेलका उद्वेगदर्शक लघुसंदेश अाला हाेता... 
‘दहाअतिरेकी मुंबईत अाले बाेटीने, 
५४० दिल्लीत पाेहाेचतील निवडणुकीने’ 
राजकारणातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे जितकं विदारक सत्य समाेर येत अाहे, तितकंच नेत्यांकडे बघितल्यानंतर जनसामान्यांची हतबल प्रतिक्रिया चिंतनीय ठरते. 
 
ससंदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर एका ज्येष्ठ पत्रकाराकडे टॅक्सीचालकाने अत्यंत बाेलकी, चिंतनीय प्रतिक्रिया व्यक्त केली हाेती. ‘साहेब, जितने हाजीर थे उन सबकाे उडा देना चाहिए था। देश उनसे ताे बचता।’ सर्वसामान्यांचे हितकर्ते, रक्षणकर्ते म्हणून संसदेत जाणाऱ्यांविषयीची कटुता प्रदर्शित हाेणाऱ्या या प्रतिक्रिया. गेंड्याची कातडी पैशाने काहीही विकत घेऊ शकताे हा दुराभिमान.. कधी अंतर्मुख हाेऊन अापण विचार करणार का? 
 
सध्या देशात निवडणुकीचे वारे जाेराने वाहताहेत. साऱ्याच पक्षांचे हेवेदावे, काेलांटउड्या या साऱ्या हतबलतेने पाहणे, नशिबी अाले म्हणून निराश हाेऊन बसण्यापेक्षा काही ठाेस करण्याची गरज अाहे. म्हणूनच नापसंतीच्या मतांचा वापर व्हावा.. हे कसं शक्य अाहे, याने काही साध्य हाेईल? अशा प्रश्नांची मालिका ज्यावेळी या मताचा वापर करण्याची अाग्रही भूमिका घेतल्यानंतर अनेक तथाकथित जाणकारांनी उपस्थित केली. ८७ वर्षांपूर्वी दांडी सत्याग्रहाच्या वेळीही अशाच प्रश्नांनी सत्याग्रहाची पाेळी अळणी ठरविली हाेती. पण, याच सत्याग्रहाने ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राजाचा रचला पाया’ असे अापण सारे अाळवू लागले. खरेतर स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात त्याहीपेक्षा खूप अगाेदर म्हणजे १८५७ च्या सुमारास झाली. ‘ताे’ लढा परकियांविरुद्ध हाेता, त्यामुळे त्यापेक्षाही अधिक अवघड या तथाकथित ‘स्वकियांच्या’ विराेधातला ताे कदाचित भाैतिक हाेता. तर हा लढा अात्मिक ठरेल. 
 
तारखेला जास्तीत जास्त पगार कसा खात्यावर येईल या चिंतेतील बहुसंख्य मध्यमवर्ग अापण भले... या काेशात अापण काय करू शकताे? या निष्क्रिय भावनेने अापल्याच कर्तव्याकडे पराङ‌्मुख तर, या तथाकथित समाजसुधारकांना, राजकारण्यांना वर्गणी कायद्याच्या बडग्याचा खाेटा-नाटा धाक दाखवून हप्ता घेणारे प्रशासन यांनी त्रस्त मध्यम व्यापारी या साऱ्यांच्या हाती मतदानाचे शस्त्र अाहे. तर नापसंतीचे मत हे दिव्यास्त्र अाहे. याचा वापर करण्याची वेळ अालेली अाहे. 
 
‘नापसंतीच्या’ धाकाने निवडणुकीवर गुंतवणूक करणारे निश्चितच विचारात पडतील. त्यामुळे अनेक चुकीचे, वाईट, गुन्हेगारीचे प्रघात थांबतील नव्हे, बंद हाेतील अाणि राजकारण शुद्धीची सुरुवात हाेईल. पैसा, अारक्षण अादी ढाली गळून पडतील समाजसेवा, समाजकारणाची ‘पूजा’ सुरू हाेईल. अाज, स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतर अारक्षण राक्षसी स्वरूपात अाक्राळविक्राळ अाकार घेत अाहे. त्याला निश्चितच अाळा बसेल. लाेकशाही स्वातंत्र्याचे तेज समाजमनास झळाळी देईल स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नपूर्तीने त्यांनी सांडलेल्या रक्ताचे सार्थक हाेईल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...