आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवा रे देवा, मंदिरांच्या दानपेटीतही ५००, १००० , नाेटा बंदीचा देवस्थानांनाही बसतोय आर्थिक फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाचशेअाणि हजाराच्या नाेटा खपविण्याचा धसका अनेक भाविकांनीही घेतलेला दिसत असून मंदिराच्या दानपेटीत अशा नाेटा अाढळून येत अाहेत. त्यामुळे अाता देवालाही त्रस्थ हाेऊन 'देवारे देवा' म्हणावे लागले नसेल तर नवल ! विशेष म्हणजे सुट्या पैशांअभावी बहुतांश दानपेटीतील यंदा कमी प्रमाणात दान जमले अाहे.

चलनातून पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अापल्याकडे असलेल्या नाेटा रद्द करण्यासाठी ग्राहकांची बंॅकांमध्ये रांगा लागल्या. तसेच एटीएममधूनही पैसे काढण्यासाठी गर्दी झाली हाेती. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. त्यातून मंदिरे सुटली असतील तर नवलच. पाचशेच्या नाेटा बंद झाल्यामुळे अनेकांनी बंॅकेत जाऊन त्या बदलवून घेतल्या; मात्र काहींनी त्या परस्पर गायब करण्याचेही धाेरण अवलंबले. म्हणूनच मंदिरांच्या दानपेट्यांमध्ये अाता माेठ्या प्रमाणात पाचशे रुपयांच्या नाेटा अाढळून येत अाहे.

नवशागणपती मंदिरात रद्द झालेल्या ७१ हजारांच्या नाेटा :
नवशागणपती मंदिरात धर्मदाय अायुक्तालयातील कर्मचाऱ्यांकडून दानपेटी उघडण्यात अाली. त्यात पाचशे अाणि हजार रुपयांची तब्बल ७१ हजार ५०० रुपयांची दक्षिणा अाढळून अाली. या रक्कमेत एक हजाराच्या १२ अाणि पाचशे रुपयांच्या ११९ नाेटा प्राप्त झाल्या. मंदिराच्या तिजाेरीतून लाख ८८ हजार रुपये निघाल्याचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले.

कपालेश्वरच्यादानपेटीत ५०० च्या तब्बल ४४ नाेटा :
पंचवटीतीलकपालेश्वर मंदिराच्या दानपेटीतही ५०० रुपयांच्या नाेटांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली अाहे. मंदिराच्या दानपेटीत ५०० रुपयांच्या तब्बल ४४ तर एक हजार रुपयांच्या सात नाेटा अाढळून अाल्यात. म्हणजेच चलनातून रद्द झालेल्या २९ हजार किंमतीच्या नाेटा दानपेटीत अाढळून अाल्याचे मंदिराचे विश्वस्थ अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी सांगितले.


काळाराम मंदिरातील दानपेटीत एरवी १०० रुपयांच्या अातील चलन अधिक असते. यंदा त्यात घट झाली अाहे. भाविकांच्या खिशात सुटे पैसेच नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम दानपेटीवर झाला अाहे. दानपेटी गेल्यावेळी उघडली तेव्हा लाख ८३ हजार रुपयांचे दान प्राप्त झाले हाेते. यंदा मात्र केवळ लाख ५३ हजार रुपयेच अाढळून अाले अाहेत. दुसरीकडे दानपेटीत फारच दुर्मिळरित्या अाढळून येणाऱ्या पाचशेच्या नाेटा यंदा तब्बल अाठ निघाल्या, असे मंदिराचे विश्वस्थ पांडूरंग बाेडके यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...