आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीचा नोटबंदीविरोधात जनअाक्रोश, ग्रामीण कार्यकर्त्यांचाच सहभाग लक्षवेधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोदी सरकारने काळ्या पैशाच्या नावाखाली केलेली नोटबंदी सर्वसामान्यांच्या मुळावर उठली आहे. किराणा, भाजीपाला आणि दैनंदिन बाबींसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत अाहे. विजय मल्ल्यांसारख्या उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करत काळा पैसा दडविण्याचाच प्रकार सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने आर्थिक स्थिती त्वरित सुरळीत केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनआक्रोश मोर्चाद्वारे दिला.

नोटबंदीच्या निर्णयाविरोधात सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह घटक पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस कार्यालयापासून निघालेला मोर्चा यावेळी नेहरू गार्डनकडून शालिमार आणि सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. संपूर्ण जिल्ह्यातून सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. कुठलीही पूर्वतयारी आणि पर्यायी व्यवस्था करताच सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच बँकेच्या बाहेर तासन््तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. ७० पेक्षा जास्त नागरिकांचा यात मृत्यूही झाला आहे. उद्योग-व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना आपल्याच हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी शासनाने जाचक अटी लावल्या आहेत. सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भाजपच्याच सहकारमंत्र्यांकडे ९१ लाख रुपयांचे आणि भाजपच्याच सांगलीच्या आमदार बंधूंच्या वाहनात कोटी रुपयांच्या जुना नोटा सापडल्या आहेत. त्यांच्यावर शासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. दुसरीकडे सर्वसामान्यांची शासनाकडून कोंडी करत के‌वळ काळ्या पैशाचे गाजर दाखवित त्यांना जगणेही अवघड केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला. शिवाय, परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांकडून शहर, जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित, आसिफ शेख यांनीही शासनाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, समिना मेमन, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, नाना महाले, मनीष बस्ते, योगिता आहेर, वंदना मनचंदा, शांताराम चव्हाण, डॉ. गिरीश मोहिते, लक्ष्मण मंडाले, उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
मोदींच्यानोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला विशेषत: शेतकरी वर्गाला बसत अाहे. त्या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाडसह ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
-राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष, कॉग्रेस

शहरातील नगरसेवक आणि शहराध्यक्षांसह मोजकेच पदाधिकारी आक्रोश मोर्चात सहभागी झाल्याचे दिसले. नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निकालामुळे प्रथम शहरात मोर्चासाठी कार्यकर्ते येतात की नाही याची शंका निर्माण झाली असतानाच, ग्रामीण कार्यकर्त्यांची थेट लक्झरी बसेसमधून लागलेली हजेरीच मोर्चाला बळ देणारी ठरली. प्रत्यक्षात आठवडाभरापासून मोर्चेचे नियोजन सुरू असताना जंबो कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी, माजी आमदार, माजी शहराध्यक्षांसह लोकप्रतिनिधींनी मोर्चाकडे पाठ फिरविल्याने काँग्रेसच्या गटबाजीचे दर्शन पुन्हा एकदा झाले.
बातम्या आणखी आहेत...