आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राज्यभरातील दिग्गजांनी मोर्चेबांधणीसह चाचपणीस प्रारंभ केला असून, त्यात पात्र तज्ज्ञांसह विद्यापीठातील काही वर्तमान पदाधिकारी व विविध समित्यांवरील मान्यवरांचा समावेश आहे. काहींनी तर राजभवनावरही चकरा मारण्यास सुरुवात केली आहे.डॉ. कृष्णकुमार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या कुलगुरुपदाकडे अनेकांच्या नजरा आहेत. मात्र, निवड प्रक्रियेच्या क्लिष्ट स्वरूपामुळे तीन महिन्यांहून जास्त कालावधी लागू शकतो.
हे मान्यवर आहेत शर्यतीत : मुक्त विद्यापीठाच्या प्रारंभापासून कार्यरत असलेले एका विभागाचे संचालक पूर्वीपासूनच या पदासाठीचे दावेदार मानले जातात. आणखी एका विद्यमान पदाधिकार्याच्या नावाची चर्चा आहे. सध्या नागपूरला असलेले व पूर्वी नाशिकरोडच्या एका महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविलेले मान्यवरही शर्यतीत आहेत. एका बाहेरील राज्याच्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गेलेले माजी प्र-कुलगुरूदेखील शर्यतीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.