आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त पार्किंग: चार शाळांना मान्यता रद्द करण्याची नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील शाळांच्या बेशिस्त पार्किंगवर ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर महापालिका शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे शाळांना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याचे सूचित केले हाेते. त्यानंतरही कार्यपद्धतीत सुधारणा करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या चार खासगी शाळांना अंतिम नाेटीस देत रस्त्यावरील पार्किंग हटविल्यास शाळेची मान्यताच काढून घेण्याचा इशारा शिक्षण मंडळाने दिला अाहे.
 
रस्ते वाहतुकीसाठीच असावेत. त्यावर वाहने उभी केली तर वाहतुकीची काेंडी हाेऊन त्याचा त्रास मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांना हाेताे, या भूमिकेतून ‘दिव्य मराठी’ने ‘बेशिस्त पार्किंगची शाळा’ ही मालिका प्रसिद्ध करून शैक्षणिक संकुलांच्या पार्किंगचा मुद्दा मालिकेद्वारे उपस्थित केला. त्याची दखल घेत पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्र सिंगल यांनी शाळांना दिवाळीपर्यंत अल्टिमेटम देत पार्किंगची व्यवस्था सुधारण्याचे अादेश दिले. त्याचप्रमाणे, वाहतूक विभागाने संबंधित शाळांना नाेटिसा काढत व्यवस्थेत सुधारणा केल्यास माेटार वाहनकायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच, नगररचना विभागाने इमारतीची परवानगीच रद्द करण्याचाही इशारा दिला अाहे. शिक्षण मंडळाने अापल्या अखत्यारीत असलेल्या सर्व खासगी शाळांना परिपत्रकाद्वारे व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना दिली.
 
त्यानुसार काही शाळांनी अापल्या व्यवस्थेत सुधारणा केली अाहे. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या चार खासगी माेठ्या शाळांनी मात्र पार्किंगच्या व्यवस्थेत बदल केल्याने शिक्षण मंडळाने संबंधितांना नाेटीस देत मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला अाहे.
 
... तर शासनाकडे प्रस्ताव पाठविणार
‘दिव्यमराठी’च्यामालिकेमुळे शाळांच्या पार्किंगचा गंभीर प्रश्न प्रकर्षाने लक्षात अाला. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित शाळांपर्यंत परिपत्रक पाेहाेचविण्यात अाले हाेते. तरीही पार्किंगविषयी कार्यपद्धती बदलल्यामुळे चार शाळांना मान्यता रद्द करण्याची नाेटीस बजावण्यात अाली अाहे. शाळांनी व्यवस्थेत बदल केल्यास शासनाकडे मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणे, अतिक्रमण निर्मूलन विभागालाही या शाळांची माहिती देण्यात अाली अाहे.
- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका
बातम्या आणखी आहेत...