आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट ‘एलईडी’बाबत ठेकेदाराला देणार नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- २०२ कोटी रुपयांच्या वादग्रस्त एलईडी प्रकरणाने नवीन वळण घेतले असून, ठेकेदाराने दिलेल्या नोटिसीला कायदेशीररीत्या चोख उत्तर देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. महापालिकेच्या वकिलांमार्फत ठेकेदारालाच निकृष्ट एलईडी पुरवठा केल्याची नोटीस पाठवली जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून एलईडी प्रकरण गाजत असून, ठेकेदाराला साहित्य पुरवठ्यासाठी ऑगस्ट २०१४ ही अंतिम मुदत होती. प्रत्यक्षात त्या कालावधीत साहित्य पोहोचल्यामुळे स्थायी समितीच्या सभेत ठेकेदाराला नोटीस देण्याचा निर्णय झाला. एवढाच नव्हे, तर निकृष्ट साहित्य पुरवठ्याबाबत कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, ठेकेदारामार्फत पुरवलेल्या एलईडी साहित्यातून येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी असल्याचाही महापालिकेचा आक्षेप होता. ठेकेदाराने मात्र मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून साहित्य दर्जेदार असल्याचे प्रमाणपत्र असल्याचा दावा केला होता. महापालिका साहित्य उचलत नसल्यामुळे ठेकेदाराने महापालिकेला नोटीस पाठविली आहे. त्याला उत्तर देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून, वकिलांमार्फत प्रत्युत्तरात ठेकेदाराला दणका देण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्याने साहित्य निकृष्ट असल्याचा लेखी खुलासाही पाठविला जाणार आहे.
८० कोटींमुळे अडचण
महापालिकेने ठेकेदाराला ८० कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिली असून, त्यामुळे ठेका रद्द करण्यात महापालिकेला कायदेशीर अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी पेलिकन पार्कच्या प्रकरणात ठेकेदारावरील कारवाईत बँक गॅरंटीमुळे अडचणी आल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...