आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांमध्ये २१ जून राेजी याेगा दिन यूजीसीने संलग्न विद्यापीठांना दिली सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारताच्या संस्कृतीची ओळख बनून राहिलेल्या याेगशास्त्राला महाविद्यालयीन स्तरावर अाता सुगीचे दिवस येणार आहेत. विद्यापीठ अनुदान अायाेग अर्थात युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) संलग्न सर्व विद्यापीठांना भारतभर २१ जून रोजी जागतिक योगादिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
या दिनांतर्गत भारतातील सर्व विद्यापीठे त्या-त्या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जाईल. यापूर्वी अशा प्रकारे खास योगाभ्यासासाठी कुठलाही दिवस निश्चित करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच हा दिवस साजरा केला जाईल. यासाठी महाविद्यालयांत योगाभ्यास जनजागृती किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत योगा पोहोचवण्यासाठी तयार केलेल्या प्रमाेशनल फिल्म्स दाखवणे. त्याचबरोबर योगाभ्यास आणि त्याविषयी असलेले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे अशा गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१७ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या याबाबतच्या सूचनापत्रात यूजीसीचे सचिव जसपाल संधू यांनी याबाबत महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या अाहेत. या पत्रात म्हटले अाहे की, भारत सरकारने आपल्या या निर्णयातून प्रत्यक्षात योग अभ्यासात क्रांती घडवून आणण्यासाठी हा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांत २१ जून २०१५ हा पहिला जागतिक योगा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांची संकल्पना, संयुक्त राष्ट्रांनी उचलून धरला विषय
राष्ट्रीय योगा दिवस साजरा व्हावा, ही संकल्पना संयुक्त राष्ट्राने सर्वप्रथम २०१४ मध्ये आत्मसात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा व्हावा, हा प्रस्ताव त्यांच्या युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ९० दिवसांच्या आत पारित झालेला हा पहिला प्रस्ताव आहे.
२७ सप्टेंबर २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये मान्यता देण्यात आली. या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाच्या १७५ सदस्यांनी मान्यता दर्शविली, यांपैकी पाच हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत.