आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरावर अाता ६९६ कॅमेऱ्यांची नजर, पालिका, पाेलिस अायुक्तालयाची संयुक्त माेहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाढती गुन्हेगारी, दहशतवादी कारवाईचा संभाव्य धाेका, घंटागाडी, पेस्ट कंट्राेल तत्सम महत्त्वाच्या सेवांवर लक्ष ठेवणे असा बहुगुणी उपाय म्हणून शहरात २६५ ठिकाणी ६९६ कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाेलिस अायुक्तालय महापालिकेने घेतला अाहे. त्यासाठी महापालिकेने सुमारे २० काेटी रुपयांचा निधी उभारणीची तयारी केली असून, शुक्रवारी महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली दाेन्ही यंत्रणांचे प्रमुख, पालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत तसा निर्णयही झाला.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीपासून नाशिक शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याविषयी चर्चा सुरू हाेती. वाढती गुन्हेगारी, दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बरेच नियंत्रण अाले यंत्रणांना कामकाजात फायदाही झाला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही सीसीटीव्हीचा वाॅच असावा, अशी मागणी हाेती. दाेन वर्षांपूर्वी महापालिकेला राज्य शासनाकडून अालेल्या अापत्कालीन निधीतूनही १७ काेटींचे कॅमेरे खरेदीचा विषय गाजला हाेता, मात्र या प्रकरणात तत्कालीन अायुक्तांसह अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार हाेण्याची भीती व्यक्त करीत महासभेने प्रस्तावच रद्द केला. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यात पाेलिस खात्यामार्फत कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव अाले. त्यात कायमस्वरूपी, भाडेतत्त्वावर कॅमेरे बसवण्यावरूनही बराच खल झाला. या सर्वात कुंभमेळा पार पडला.
मार्च महिन्यात नाशिक दाैऱ्यावर अालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे अादेश दिले हाेते. त्यानंतर पाेलीस अायुक्त जगन्नाथ यांनी पुढाकार घेतला हाेता. दरम्यान त्यांच्या बदलीनंतर अाता पाेलीस अायुक्त रवींद्र सिंघल यांनी लक्ष घातले. सिंघल यांनी मध्यंतरी सातपुर येथे भेट दिल्यानंतर स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी कॅमेरे बसवण्याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती केली हाेती. महापालिकेकडून कॅमेरे बसवण्यासाठी निधीची तरतुदही केली जाईल असे अाश्वासन दिले हाेते. त्यानुसार दाेन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. शुक्रवारी पाेलिस अायुक्तालयात झालेल्या बैठकीत कॅमेरे बसवण्याबाबत महत्वपुर्ण चर्चा झाली.

यावेळी महापाैर, स्थायी समिती सभापतींसह, उपमहापाैर गुरमित बग्गा, अायुक्त अभिषेक कृष्णा, विराेधी पक्षनेता कविता कर्डक, गटनेता अनिल मटाले, प्रकाश लाेंढे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. कॅमेरे बसवल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी पाेलिस अायुक्तालय महापालीका मुख्यालयात दाेन नियंत्रण कक्ष असतील असेही स्पष्ट केले.

नवीन इमारतींना यापुढे कॅमेरा सक्ती
शहरात नवीन इमारती उभारताना अाता तेथे कॅमेरे बसवण्याबाबतही सक्ती करण्याचा नियमच करण्याची मागणी महापाैरांनी केली. त्यासाठी नगररचना विभागाने परवानगी देतानाच संबंधित अट घालावी, अशीही सूचना केली. त्याचा विचार केला जाईल, असे महापालिका आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

पालिकेच्या महत्त्वाच्या सेवाही नियंत्रणात
महापालिकेच्या अनेक मूलभूत सेवांचा बाेजवारा उडाल्याची तक्रार अाहे. या कॅमेऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांपासून तर घंटागाडी, पेस्ट कंट्राेल अशा नानाविध ठेक्यांचे कामकाज खराेखरच सुरळीत हाेते की नाही, याची खातरजमा करणे शक्य हाेणार अाहे. त्यामुळे महापालिकेकडून अंदाजपत्रकात तशी तयारी करण्याबाबत चाचपणी सुरू अाहे.

नगरसेवकांना विचारून कॅमेऱ्यांची स्थळे ठरणार
या याेजनेचे तांत्रिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने २६५ स्थळे निश्चित केली असून, त्यातील अनेक स्थळे शहराच्या बाह्य भागातील असल्यामुळे कॅमेऱ्याचा फायदा हाेणार नाही, याकडे सलीम शेख यांनी लक्ष वेधले. मुळात अंतर्गत काॅलनी भागात गुन्हेगारीचे प्रमाण माेठे अाहे. साेनसाखळी चाेरी, घरफाेडी अन्य गुन्हे अंतर्गत भागात घडत असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त कॅमेरे बसवावे, अशी मागणीही केली. कॅमेऱ्यांसाठी स्थळे निश्चित करताना १२२ नगरसेवकांच्या सूचनांचाही विचार करावा, असेही सुचवले. त्यास सर्वांनी अनुमाेदन दिले.
बातम्या आणखी आहेत...