आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Bus From Cidco And Pathardi To College In Nashik

सिडको आणि पाथर्डीतून आता कॉलेजरोडपर्यंत बस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिडको आणि पाथर्डी येथून थेट कॉलेजरोडपर्यंत जाण्यासाठी शहर बस नसल्याने विद्यार्थी वर्गाची मोठी अडचण होत होती. विशेषत: विद्यार्थिनींची कुचंबणा होत होती. ही बाब लक्षात घेऊन ‘सहकारातून समस्यामुक्ती’ उपक्रमांतर्गत ‘दिव्य मराठी’ने हा मुद्दा पुढे आणला होता. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामत: येत्या आठवड्यात या दोन्ही मार्गांवरून सकाळच्या वेळी शहर बस धावणार आहे.

सिडको पाथर्डी येथून एचपीटी, आरवायके किंवा बीवायकेसह अन्य महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी सिडकोतून थेट बसच नव्हती. आणि तेथून रिक्षाने वा दुसऱ्या बसने महाविद्यालयापर्यंत पोहोचावे लागत. यात प्रवासावर विद्यार्थ्यांचा जादा खर्च होत होता. शिवाय, सीबीएसपासून कॉलेजरोडपर्यंत जाणाऱ्या बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे सिडको पाथर्डी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा मिळत नव्हती. ही बाब काही महिन्यांपूर्वी ‘दिव्य मराठी’ने प्रकर्षाने मांडली तिचा पाठपुरावाही केला होता. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही पुढाकार घेऊन ही बससेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले. यासाठी राविकाँचे उपाध्यक्ष भूषण काळे, देवांग जाेशी, राहुल पवार, वैभव गांगुर्डे, विशाल मटाले, सिद्धेश चव्हाण यांनी विभाग नियंत्रक यामिनी जाेशी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानुसार, यापूर्वी सिडकोतून सीबीएसपर्यंत जाणारी बस आता थेट कॉलेजरोडपर्यंत जाईल. तसेच, पाथर्डीकडून येणारी बस कॅनडा कॉर्नरमार्गे कॉलेजरोडला जाणार आहे.
‘दिव्य मराठी’ने लक्षात आणून दिला मुद्दा
-‘दिव्यमराठी’तील वृत्तानुसार आम्ही तातडीने विभाग नियंत्रकांची भेट घेऊन सिडको पाथर्डीतून कॉलेजरोडपर्यंत बसची केलेली मागणी मान्य झाली आहे. तसे पत्रही आम्हाला मिळाले आहे.
भूषण काळे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
असा असेल मार्ग
उत्तमनगर- त्रिमूर्ती चौक- सीबीएस- कॉलेजरोड - महात्मानगर
पाथर्डी येथील विक्रीकर भवन - सीबीएस - कॅनडा कॉर्नर - कॉलेजरोड - महात्मानगर
आठवडाभरात मार्ग वाढविणार
- विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सिडको विक्रीकर भवन येथून कॉलेजरोडपर्यंतच्या पूर्वीच्या बसेसचा मार्ग वाढविण्यात आला आहे. आठ दिवसांत ही सेवा सुरू होईल.
यामिनी जोशी, विभागनियंत्रक, एसटी महामंडळ