आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता डिप्लोमा, बीए इन रोड ट्रान्सपोर्ट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - अपघातांचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनतेमुळे वाहनचालकांचे ढासळणारे संतुलन या सर्व गोष्टींचा विचार करून सुरक्षित वाहतुकीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे रोड ट्रान्सपोर्टसंदर्भात अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात वाहनचालकांला रस्त्यावर वावरताना घ्यावयाची काळजी यासाठीची शास्त्रशुद्ध माहिती देण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत जिल्ह्यात सध्या या अभ्यासक्रमाच्या प्रचाराची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वाहनचालकांवरील वाढत जाणारा ताण आणि त्यामुळे वाढलेल्या अपघातांचे प्रमाण या सर्व बाबी विचारात घेऊन वाहनचालकांसह वाहतुकीशी निगडित असलेल्या सर्व घटकांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत वाहतुकीशी निगडित माहिती देण्यात येणार आहे.
असा असेल अभ्यासक्रम : अभ्यासक्रमात सुरक्षित वाहतुकीसंदर्भात नियम, कायदे, जागृती, अपघातमुक्त वाहतूक, ताणतणावमुक्त व्यवस्थापन, सामाजिक जाणीव, तणावरहित वाहतूक याचा समावेश असणार आहे.