आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराणा वस्तूंचे दर वाढल्याने दिवाळीचा फराळ महागला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डाळी,साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढल्याने यंदा फराळ महागला अाहे. महागाई नियंत्रणात अाल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली अाहे. गतवर्षी हजार रुपयांत झालेल्या फराळाच्या यादीकरिता यंदा किमान १२५० रुपये माेजावे लागतील, अशी स्थिती अाहे. किराणा दुकानात सामानाच्या यादीचे बिल पाहता यंदाची दिवाळी नक्कीच सर्वसामान्यांचे दिवाळं काढेल, असे चित्र अाहे.
दीपाेत्सवाचा सण म्हणून दिवाळी घराघरांत साजरी हाेते. हिवाळ्यात येणारा हा सण असून, हिवाळ्यात स्निग्धतेची गरज अधिक असते. पचनशक्तीही जास्त असते. त्यामुळेच मिष्टान्न, तेल-तूपात तळलेल्या वस्तू सहज पचतात वर्षभरासाठीचे बळ मिळते. यामुळेच दिवाळीत सुकामेवा असलेल्या डाळीच्या पिठाचे लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळे यांसारख्या तूप-तेलात तळलेल्या पाैष्टिक फराळ करण्याची परंपरा अाहे. अाजही घराघरांतून ती कायम अाहे. दिवाळी अाता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली असून, फराळाचे पदार्थ तयार करण्यास घराेघरी सुरुवात हाेणार अाहे. मात्र, यंदा फराळाकरिताच्या लागणाऱ्या विविध वस्तूंच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत सरासरी २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने गृहिणींत चिंता व्यक्त हाेत अाहे.

डाळ दुपटीने महाग
^गतवर्षीपेक्षा यंदाडाळींचे दर दुपटीने वाढले अाहेत. रवा मैदा यांचे दर मागील वर्षीइतके असून, इतर सर्वच वस्तू महागल्या अाहेत. ग्राहकांकडूनही या दरवाढीबाबत अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. -हेमंतपवार, संचालक, पांडुरंग गाेपाळ पवार

वर्षभराचे बळ मिळते हिवाळ्यातील फराळाने
^हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची गरज शरीराला जास्त असते, पचनशक्तीही जास्त असते, त्यामुळे पाैष्टिक, तेल-तूपाचे पदार्थ खाल्ले जातात. वर्षभर पुरेल इतके बळ या काळात शरीरात साठविले जाते. यामुळे त्वचा काेरडी हाेत नाही, तर सांध्यांची कुरकुरही हाेत नाही. -वैद्य राहुल सावंत
बातम्या आणखी आहेत...