नाशिक - राष्ट्रीय स्तरावर अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेटचे केंद्र नाशिकमध्ये सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहेे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर रोजी देशातील ९० मोठ्या शहरांबरोबरच नाशिकमधील केंद्रावरही ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल.
जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ होईल. या आधी विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी पुणे, मुंबई, जळगाव आणि औरंगाबादमधील केंद्रावर ते तास प्रवास करून जावे लागत होते. नेट परीक्षेची वेळ सकाळी ची असते त्यामुळे केंद्रावर सकाळी ८.३० वाजताच उपस्थित राहण्याच्या यूजीसीकडून सूचना असतात. त्यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म किंवा फूटपाथवर राहण्याची वेळ येत असल्याने अार्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी होत्या. परीक्षा केंद्र जवळ नसल्याने बहुतांश विद्यार्थी परीक्षाच देत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यासाठी नेट परीक्षेचे केंद्र सुरू करण्यासाठी खासदार गोडसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याबाबत यश मिळत केंद्रीय माध्यमिक शिक्षा केंद्राने नाशिक येथे नेट सेंटरसाठी परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात नेट परीक्षा केंद्र देणे होते आवश्यक
राज्यस्तरीय सेट अर्थात स्टेट इलिजिबिलिटी टेस्टचे केंद्र नाशिकमध्ये आहे. वर्षातून दोनदा नेटची परीक्षा होते. मात्र नाशकात केंद्र नसल्याने बहुतांश विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशकात असल्याने जिल्ह्यात नेट परीक्षा केंद्र देणे आवश्यक होते.
पाठपुराव्याला यश
शहरात अनेक पदव्युत्तर पदवीची महाविद्यालये आहेत. एज्युकेशन हब म्हणून शहर उदयास येत आहे. त्यामुळे नेट परीक्षेचे केंद्र नाशिकमध्ये सुरू करण्यासाठी सखोल अभ्यास करत पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून नाशिकमधून नेटची परीक्षा आता देता येईल.
- हेमंत गोडसे, खासदार