आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता २० रुपयांत रंगीत मतदार कार्ड, निवडणूक आयोगानेच नियुक्त केल्या संस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तुमच्या मतदार कार्डवरचे छायाचित्र अस्पष्ट असेल, जर ते तुम्हाला आवडत नसेल तर आता तुम्हाला रंगीत स्मार्टकार्ड स्वरूपाचे मतदार कार्ड देण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सेवा ऐच्छिक असून, ज्याला हवे असेल त्याला हे रंगीत मतदान कार्ड घेता येणार अाहे. पण, त्यासाठी मात्र २० रुपये शुल्क आकारले जाणार असून, साधारणत: पंधरा दिवसांत ही सुविधा जिल्ह्यात सुरू हाेणार अाहे.

नागरिकांनी मतदार यादीत अापले नाव नोंदविल्यानंतर प्रत्येक मतदाराला नव्याने मतदार कार्ड दिले जाते. पण, या कार्डवर नोंदणीधारकांकडे असलेल्या वेब कॅमेऱ्याद्वारेच छायाचित्र घेतले जाते. त्याचा दर्जाही फारसा चांगला नसतो. शिवाय, हे छायाचित्र कित्येक वर्षे तसेच राहात असल्याने अनेकदा प्रत्यक्षात मतदार आणि त्यावरील छायाचित्र यात काहीशी तफावत जाणवते. त्यामुळे मतदारही या कार्डबाबत नाराजी व्यक्त करतात. तर, अनेकांनी ते दर्जेदार छापण्याचीही मागणी आणि सूचना निवडणूक आयोगाला केल्या आहेत. आयोगाने मात्र सरसकट मोफत सर्वांचेच कार्ड डिजिटलाइज करता हे कार्ड ऐच्छिक केले आहे. ज्याला ते डिजिटलाइज हवे असेल त्याच्याकडून कार्डासाठी २० रुपयांची आकारणी केली जाईल. विशेष म्हणजे, हा निर्णय भारत निवडणूक आयोगानेच घेतला आहे. त्यांनी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हे कार्ड छापून देणारी संस्था (कंत्राटदार) निश्चित केली आहे. नाशिक जिल्ह्यात सेतूचे काम देण्यात आलेल्या संस्थेलाच हे काम देण्यात आले आहे. त्यानुसार आता सेतूत २० रुपयांत नवीन डिजिटलाइज मतदार कार्ड संबंधित मतदाराला मिळेल. यामुळे मतदारांना अाता मतदार अाेळखपत्र स्मार्ट कार्डच्या रूपात उपलब्ध हाेणार असल्याने त्याचा सांभाळ करणेही साेयीचे हाेणार अाहे.

१५ दिवसांनंतर जिल्ह्यात सुविधा मिळणार
नाशिक जिल्ह्यात सेतूला हे काम जरी देण्यात आले असले तरीही याबाबतची संपूर्ण प्रक्रिया, विविध स्थानिक आदेशांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीसह हे कार्ड प्रत्यक्षात मिळण्यास अथवा त्याची सुविधा जिल्ह्यात सुुरू होण्यास साधारणत: १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...