आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपीएसमुळे वाढणार शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा, कळणार वाहनाची गती व थांबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- शहरातीलसध्या वाढलेली वर्दळ आणि बेजबाबदार वाहतुकीकडे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पाल्य घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात. तसेच, शाळा प्रशासनाला आपल्या विद्यार्थ्यांबाबत काळजी असल्याने तेही अधिक धोका घेत नाही. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाने स्कूल बसमध्ये जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टिम) बसविले आहे. त्यामुळे बसची गती, विद्यार्थी कोणत्या थांब्यापर्यंत पोहोचला आहे. तसेच, बसमध्ये पाल्य सुरक्षित आहे का, याची माहिती पालक आणि शाळा प्रशासनाला मिळणार आहे.
शहरात बहुतांश शाळांनी स्वत:च्या स्कूल बस सुरू केल्या आहेत. काही शाळांमध्ये खासगी व्हॅन रिक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसला प्राधान्य देतात. मात्र, स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांंना घरून घेण्यासाठी लवकर आणि सोडण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत पालकांना चिंता असते. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि पालकांची चिंता थांबविण्यासाठी नाशिकरोड येथील के. जे. मेहता स्कूलमध्ये संस्थेच्या बसमध्ये जीपीएस बसविण्यात आले आहे. त्याचे उद््घाटन सोमवारी शाळेच्या आवारात करण्यात आले. यावेळी सचिव प्रवीण जोशी, प्राचार्या शुभांगी गायधनी, करुणा आव्हाड, शिवाजी राहिंज, उत्तम कदम, भागीरथ घोटेकर, अश्विनी दापोरकर, प्राचार्य पी. एम. झेंडे, दशरथ जारस, सुनील परदेशी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांच्या बसमधील विद्यार्थ्यांना स्टाॅपची माहिती माईकवरून देताना बसचालक.
बसेसवर शाळेचे पूर्ण लक्ष राहणार...
- विद्यार्थी सुरक्षेसाठी पालकांना चिंतामुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये पालकांचा वेळदेखील वाचणार आहे आणि बसवर शाळा प्रशासनाचे पूर्णपणे लक्ष राहाणार आहे. -शुभांगी गायधनी, प्राचार्या, के. जे. मेहता स्कूल, नाशिकराेड

अशी आहे जीपीएस प्रणाली...
- विद्यार्थी घरापासून आणि शाळेपासून किती अंतरावर आहे, हे मोबाइलद्वारे समजणार.
- स्कूलबसचा वेग हा ताशी ४० पेक्षा अधिक झाल्यास त्याची माहिती शाळा प्रशासनाला समजणार आहे.
- विद्यार्थ्यांना येणारा आलेला थांबा सांगण्यात येणार, त्यामुळे उतरण्यासाठी सावध होतील.
बातम्या आणखी आहेत...