आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या दुचाकीबरोबर हेल्मेट देणे सक्तीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई मोटार व्हेइकल कायद्यानुसार दुचाकी खरेदी करतानाच त्यात हेल्मेट देण्याची सक्ती आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी आजवर होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र सर्वच दुचाकी डिलरला या कायद्याविषयी लेखी स्वरूपात अवगत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाहनमालकांनाही याविषयीचे पत्र देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. यापुढील काळात वाहनासोबत हेल्मेट देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यासह नाशिकमध्येहीहेल्मेट घालणे आणि सीटबेल्ट लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमाची लगेचच सक्ती केल्यास त्यातून लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे थेट सक्ती करता पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती देताना जीवन बनसोड पुढे म्हणाले की, सीटबेल्टचा वापर करण्यास खरेतर कोणाचाही नकार यायला नको. कारण सीटबेल्ट हा चारचाकी वाहनात लावलेलाच असतो. त्याचा वापर करण्याची सवय तेवढी लावायची आहे.
हेल्मेट खरेदी करायचे असल्याने अनेकांमध्ये ते वापरण्याची वृत्ती दिसते. खरेतर कायद्यानुसार वाहन विक्री करतानाच साधनसामग्रीत (अॅक्सेसरीज) हेल्मेट असणे गरजेचे आहे. म्हणजेच प्रत्येक वाहनाबरोबर हेल्मेटही देणे संबंधित डिलरला आवश्यक आहे. आजवर ते देण्यास टाळाटाळ केली जात होती. आता मात्र ते बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतीत आरटीओ कार्यालयाने शहरातील सर्वच डिलरशी चर्चा केली असून, लेखी स्वरूपाचे पत्रही दिले आहे. या नियमाची अंमलबजावणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

संस्थात्मक पातळीवर पुढाकार घ्यावा
हेल्मेटसीटबेल्टविषयी जनमत तयार होणे गरजेचे आहे. कायदेशीररीत्या आम्ही पुढील काळात कारवाई करणार आहोतच. परंतु, आता वाहनचालकांनी स्वत:हून नियमांचे पालन करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. मविप्र आणि महात्मा गांधी विद्यामंदिरसारख्या संस्थांनी याविषयी संस्थात्मक पातळीवर निर्णय घेऊन हेल्मेट आणि सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. ही बाब वाखाणण्याजोगी असून, अन्य संस्थांनीही असा पुढाकारा घ्यावा. महाविद्यालयीन पातळीवरूनच अशी जागृती झाल्यास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हेल्मेटधारी सीटबेल्ट लावणारे दिसू लागतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी सांगितले.