आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now India\'s Social Network Site : Nashik\'s Dilip Wagh Develope Its

\'दखल डॉट इन\' ही आता सोशल नेटवर्किंग साईटच्या शर्यतीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सध्या केवळ जनसंपर्काचे माध्यम म्हणून वापरल्या जाणा-या सोशल नेटवर्किंग साइट्सला व्यापक अर्थ देण्याचे काम नाशिकमध्ये सुरू झाले आहे. मनोरंजन व गप्पाटप्पा यापलीकडे जाऊन सोशल नेटवर्किंगचा वापर करता येऊ शकतो हे नव्यानेच सुरू झालेल्या ‘दखल.इन’ या वेबसाइटने सिद्ध केले आहे. महिनाभराच्या अवधीतच या वेबसाइटला तब्बल 13 देशांतील नागरिकांची पसंती मिळाली आहे.

नाशकातील तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपर दिलीप वाघ व त्यांचा 13 वर्षीय मुलगा शुभम यांनी ‘फेसबुक’च्या धर्तीवर ही साइट सुरू केली आहे. बँकिंग, औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शनासह सराव प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र ब्लॉग देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंगमध्ये प्रथमच माझे गाव आणि सिनेस्टार्स, नेते यांच्यासह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटीजच्या किमान 25 पिढ्यांची वंशावळदेखील आहे.

पहिलीपासून ते बारावी आणि इंजिनीअरिंग, व्यवस्थापन, कॉम्प्युटर सायन्स, एरोनॉटिकलच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या साईटद्वारे अभ्यास करताना येणार आहे. मुक्त विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासह 20 हजार अभ्यासक्रमांच्या व्हिडीओ, ऑ डिओ क्लिप्स आहेत.

आठवीतील विद्यार्थ्याचे कुतूहल
सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणा-या शुभमला वडील दिलीप दखल साइटचे काम करीत असताना माझे गाव, वंशावळ, शालेय अभ्यासक्रम या कल्पना सुचल्या. आपल्या मूळ गावाविषयी प्रत्येकालाच आपुलकी, प्रेम असल्याने आणि वाडवडिलांचे मूळ शोधण्याचे कुतूहल असते. त्याचदृष्टीने शुभम याने स्वत:च्या मालेगाव तालुक्यातील वडगावपासून सुरुवात केली. तिथे प्रत्यक्ष जाऊन गावातील मंदिरे, शेती, शाळा यांची छायाचित्रे काढून ते साइटवर लोड केले. पूर्वजांविषयीची माहिती जमा करण्यासाठी प्रत्येक समाजाच्या भाटांची राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये जाऊन भेटी घेतल्या. त्यांच्याकडून वंशावळीचा डाटा जमा करण्यात येत आहे.

महिलांसाठी पाककला
या साइटवर महिलांना घरी स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या पाककलादेखील उपलब्ध असल्याने महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये शाकाहार-मासांहार पदार्थांसह वेगवेगळ्या शहरातील प्रमुख खाद्यपदार्थांच्या पाककृती देण्यात आल्या आहेत. तसेच बातम्या, प्रश्नमंजूषा, इव्हेन्ट्ससारख्या कॅटेगरीज उपलब्ध आहेत.