आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी नदीच्या महाआरतीला लाभले ‘तान’चे कोंदण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
|नाशिक - हरिद्वारआणि वाराणसीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या गोदावरीच्या महाआरतीसाठी पुरोहित संघाला ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचीही साथ लाभली आहे. असोसिएशनतर्फे यापुढे गाेदावरीच्या आरतीची छायाचित्रे सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये लावण्यात येणार असून, शहरात येणा-या प्रतिष्ठित व्यक्तींना आरतीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. यात परदेशी पाहुण्यांचाही समावेश असेल.
या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. स्पेनचे पाहुणे मारियानो ज्वॉन वॉ आणि श्रीमती पिलार यांना सोमवारच्या आरतीचा मान मिळाला. वाराणसी आणि हरिद्वार शहरांतील नदीच्या आरतीला दररोज शेकडो भाविक उपस्थित असतात. पुरोहित वर्ग, टाळ, घंटानाद अशा स्वरूपात ही आरती होत असल्याने तिच्याकडे भाविक आणि पर्यटक आकर्षित होतात. नाशिकमधील गोदावरी नदीचे महत्त्वही गंगा नदीइतकेच आहे. मात्र, येथे यापूर्वी अतिशय छोट्या स्वरूपात आरती होत होती. ब-याचदा या आरतीला भाविक उपस्थित राहत नव्हते. अशा वेळी ही आरती रद्दही व्हायची. तत्कालीन महापौर यतिन वाघ यांनी २०१२ मध्ये महाआरती सुरू करण्याची घोषणा केली. तेव्हा पुरोहित संघाने आरतीसाठी पुढाकार घेतला. कालांतराने महापालिकेने या उपक्रमातून सहभागच काढून घेतला. मात्र, पुरोहित संघाने आरतीत नियमितता ठेवली. आता त्यांना तान संस्थेची साथ लाभली आहे.
पुरोहित संघ आणि तान संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या गोदावरीच्या महाआरतीस उपस्थित स्पेनचे पर्यटक भाविक.

पाहुण्यांचा मुक्कामही वाढेल
पुरोहितसंघ आणि तानतर्फे महाआरतीचे नियोजन होईल. येणा-या पाहुण्यांसाठी हा आकर्षणाचा विषय ठरेल. आरतीची वेळ सात वाजेची असल्याने पाहुणे आरती करून मुक्कामी राहतील. व्यावसायिक उद्देशही साध्य होईल. दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

जगातील लौकिक वाढेल...
गोदावरीचाजगात असलेला लौकिक या महाआरतीने अधिक वाढेल. गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी आरतीचे प्रयोजन केले जाते. काही लोक आरती करून वाढदिवस साजरे करतात. या उपक्रमाचे स्वागत आहे. सतीशशुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

याआरतीने प्रदूषणमुक्तीही शक्य
नाशिकमध्येमिळालेल्या मानसन्मानामुळे मी भारावून गेलो आहे. अशा प्रकारच्या विधींमुळे गोदावरी नदी प्रदूषणमुक्तही राहण्यास मदत होऊ शकते. हा उपक्रम नियमितपणे व्हावा, ही अपेक्षा आहे. ज्वॉन वॉ, स्पेनमधील रहिवासी

कुतूहल आणि सरावदेखील...
गोदावरीमहाआरतीचा मान मिळालेले स्पेनचे ज्वॉन वॉ आणि श्रीमती पिलार यांच्या चेह-यावर आरतीचे कुतूहल दिसत होते. आरतीसाठीच्या प्रत्येक हालचाली ते निरखून बघत होते. आरतीचे ताट फिरवण्याचा काही क्षणासाठी त्यांनी सराव केला. प्रारंभी फेटे बांधून त्यांचा सत्कार झाला. त्यानंतर आरती सुरू झाली. चुकता त्यांनी हा विधी पार पाडला. या वेळी ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, मनोज वासवानी, सागर वाघचौरे, हृषिकेश मांदरे, अमरिश मोरे, दत्ता टाक, दिलीपसिंह बेनिवाल, साहेबराव आव्हाड आदी उपस्थित होते.