आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Maharashtra Navnirman Sena Give Their Work Information On Aap

आता मनसेचेही ‘करून दाखवले’, सत्ताकाळात केलेल्या कामांची माहिती देणारे पेज अॅप खुले हाेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी दाै-यासाठी आगमन झाले असता पक्ष पदाधिका-यांसह महापाैर अशाेक मुर्तडक यांनी त्यांचे स्वागत केले.
नाशिक - राज्यातील एकमेव सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरात केलेल्या कोट्यवधींच्या कामांचे दर्शन आता मनसेच्या नाशिक वेबपेज अॅपमधून होणार आहे. काही काळापूर्वी गाजलेल्या शिवसेनेच्या ‘करून दाखवले’ या प्रचाराच्या धर्तीवरच मनसेही दोन वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या तयारीस लागल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २) या पेजचे उद‌्घाटन होण्याची शक्यता आहे.

महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर मनसेला प्रभावी कामे करता आली नसल्याचा सूर व्यक्त झाला. अंतर्गत भांडणे पदाधिका-यांचा अंकुश नसल्यामुळे महापालिकेत मनसेची वाताहत झाली. अपेक्षाभंग झाल्यानंतर लोकांनी मनसेला लोकसभा विधानसभा निवडणुकीत धोबीपछाडही दिली. या सा-या घडामाेडींमध्ये राज यांनी शांतपणे पक्षाची वाटचाल सुरू ठेवत नाशिकमधील कामांकडे गेल्या काही महिन्यांत लक्ष केंद्रित केले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात कोट्यवधी रुपयांचे रस्ते अन्य कामे होत असून, मनसेच्या सत्ताकाळात होणा-या या कामांची माहिती आता वेबपेजद्वारे सर्वांसाठी खुली करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातूनच मनसेने नाशिकचे कसे ‘नवनिर्माण’ केले याचेही दर्शन सर्वांना एका क्लिकसरशी होईल, असे एका पदाधिका-याने सांगितले. याबरोबरच मनसेचे अॅपही येणार असून, त्यावर लाेकांना तक्रार करण्यापासून अन्य आवश्यक माहितीही मिळवता येणार आहे.

राज पिता-पुत्र नाशिकमध्ये
बुधवारीसायंकाळी राज ठाकरे आपले पुत्र अमित यांच्यासह नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांचे ‘हॉटेल एक्सप्रेस इन’मध्ये महापौर अशोक मुर्तडक, महानगरप्रमुख अॅड. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह पदाधिका-यांनी जोरदार स्वागत केले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त उपस्थित होते. गुरुवारी (दि. २) सकाळी राज शहरातील वास्तुविशारदांची बैठक घेतील. तसेच, गोदापार्कची पाहणी करून अन्य कामांचा आढावा घेतील. महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत महत्त्वाची बैठकही हाेणार आहे.

अरे, तू पुन्हा इकडे कसा आलास रे?
विधानसभािनवडणुकीनंतर पक्षातील काही माजी पदाधिका-यांवर नाराज असलेले पदाधिकारी चक्क स्वागतासाठी आल्यामुळे राज यांनाच धक्का बसला. भाजपमध्ये गेलेल्या काही पदाधिका-यांबराेबर मनसेतील माेठे समर्थक गेल्याचा दावा केला जात हाेता. मात्र, समर्थक पदाधिकारीच स्वागतासाठी उभे असल्याचे पाहून राज यांनाही प्रश्न विचारल्यावाचून राहवले नाही. माजी प्रवक्ते अभिजित बगदे यांना पाहून राज यांनी ‘अरे, तू इकडे कसा’, असे विचारले. त्यावर बगदे यांनी स्वागतासाठी आल्याचे सांगितले. राज यांनी ‘पुन्हा इकडे कसा आलास रे?’ असा प्रश्न करीत अन्य पदाधिका-यांच्या पुष्पगुच्छांचा स्वीकार केला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी दाै-यासाठी आगमन झाले असता पक्ष पदाधिका-यांसह महापाैर अशाेक मुर्तडक यांनी त्यांचे स्वागत केले.

एप्रिलअखेर शहर जिल्हा कार्यकारिणीची फेररचना
मनसेच्याशहर जिल्हा कार्यकारिणीची एप्रिलअखेर फेररचना हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. साधारणपणे १० एप्रिलला संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर हर्षल देशपांडे यांच्या उपस्थितीत इच्छुक पदाधिका-यांच्या मुलाखती हाेतील त्यानंतर राज पुढील दाै-यात कार्यकारिणी जाहीर करतील, असेही सांगण्यात आले.