आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण काेरियात डंका वाजविल्याचा अभिमान, कोरियन तरुणींना नृत्याने पाडली भुरळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- नऊवारीतील नजाकत, लावणीचा मराठमाेळा ठसका, टाळ्या शिट्ट्यांची दाद... हे चित्र महाराष्ट्रातील एखाद्या कलामंदिरातील नव्हे तर दक्षिण काेरियात दिसले. या देशाच्या सिअाेल शहरात नाशिकच्या माधुरी महाले या विद्यार्थिनीने ‘आता वाजले की बारा’ या लावणीवर बहारदार नृत्य सादर केले अाणि चक्क काेरियन तरुणींनाही त्यांच्यासाठी नव्या असलेल्या या नृत्यप्रकाराची भुरळ पडली. कार्यक्रमानंतर अनेक तरुणींनी माधुरीची भेट घेत लावणीचा साज चढविण्याची विनंती केली. त्यानुसार काेरियन तरुणींनी केलेला मराठमाेळा पेहराव महाराष्ट्राच्या या लाेककलेला अधिक समृद्ध करून गेला नसेल तर नवल!

येथील बिटको महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली माधुरी दिगंबर महाले हिने नियमित शिक्षणासोबत राष्ट्रीय सेवा योजनेतही सहभाग घेतला. या योजनेत तिने अापल्या अंगभूत कलागुणांची चुणूक दाखविल्याने २०१६ च्या प्रजासत्ताक दिनासाठी तिची दिल्लीच्या परेडला निवड झाली. परेडच्या सरावासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. या कालावधीमध्ये स्वयंसेवकांच्या शिस्त, स्वच्छता, आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग यावर गुप्त निगराणी ठेवली जाते. याच कसोटीतून पार पडलेल्या माधुरी महालेची दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड करण्यात आली.
माधुरीने कोरियामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली लावणी सादर केली. त्यानंतर उपस्थितांमधील अनेक तरुणींनी व्यासपीठाच्या मागच्या बाजूला धाव घेत माधुरीचे ताेंडभरून काैतुक केले. हे इतक्यावरच थांबले नाही तर मराठी पेहराव परिधान करण्याची काही तरुणींनी इच्छाही दर्शविली. माधुरीनेही तातडीने तिच्याकडे असलेल्या नऊवारी मुलींना वापरायला दिल्यात. त्यानंतर सुरू झाले फाेटाेसेशन अणि सेल्फीचे प्रयाेग.

दक्षिणकोरियामध्ये निवड होईल याबाबत काहीच माहिती नव्हते. दिल्लीतील परेडनंतर सुमारे दीड महिन्याने मला काॅल अाला त्यावर माझी निवड झाल्याची माहिती मिळाली. दक्षिण कोरियामध्येही भारताचा डंका वाजविल्याचा मला अभिमान आहे -माधुरी महाले, बिटको महाविद्यालय नाशिकरोड

कोरियाच्या क्रीडामंत्र्यांनी दिले ब्रेसलेट :
माधुरीच्यादिलखेचक लावणी नृत्याची दखल घेऊन दक्षिण कोरियाच्या क्रीडामंत्र्यांनी माधुरीला हातातील मोत्याचे ब्रेसलेट काढून तिला बक्षीस दिले. एखाद्या प्रमाणपत्रापेक्षा क्रीडामंत्र्यांनी दिलेली ही प्रेमाची भेट माधुरीला अधिक महत्त्वपूर्ण वाटते.

कुलगुरुंनी केला माधुरीचा सत्कार :
यामहोत्सवासाठी भारतातून केवळ चौघांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकची माधुरी महाले (लावणी), औरंगाबादची स्नेहल कथारे (कथ्थक), पंजाबचा संदीप भाजवा (पंजाबी ढोल) तर राजस्थानच्या प्रतिभाकुमारी (राजस्थानी नृत्य) यांनी आपली कला सादर केली. त्यानिमित्ताने माधुरी महालेचा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...