आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारी रोखण्यासाठी अाता एकाच वेळी मार्केट पाॅइंट चेकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी सोनसाखळी, मोबाइल चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनास अपयश येत आहे. या स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मार्केट चेकिंग ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडळ मधील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

शहराची गुन्हेगारी काही प्रमाणात अाटोक्यात आणण्यात पोलिस प्रशासनास यश आले. दोन कुख्यात टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली. सुमारे ३० गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. या कारवाईनंतर जवळपास दोन महिन्यांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी, मोबाइल, दुचाकी आणि इतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात अवैद्य शस्त्र खरेदीच्या घटनांत वाढतआहे. शहरात शस्त्र विक्री करणारी मोठी टोळीच कार्यरत अाहे. मात्र, या टोळीचे पाळेमुळे खणण्यात पोलिस प्रशासनास अपयश येत आहे. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशान्वये शहरातील पॉइंट चेकिंग मोहीम कारवाई सुरू करण्यात आली आहे. परिमंडळ मध्ये एकाच वेळी पॉइंट चेकिंग करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शहरातील बाजार, उपबाजार, आणि वर्दळीच्या ठिकाणी घडणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वाटावे याकरिता ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

परिमंडळ : आडगाव- (आडगाव मार्केट, निलगिरी बाग) म्हसरुळ - (म्हसरुळगाव, पेठरोड, मार्केट, रासबिहारी मार्केट) पंचवटी - (पंचवटी कारंजा, निमाणी मार्केट, रामकुंड) मुंबई नाका - (गोविंदनगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक), भद्रकाली - शालिमार, गाडगे महाराज पुतळा, दहिपुल), सरकारवाडा - ( सराफबाजार, मेनरोड, रविवार कारंजा), गंगापूर - (आकाशवाणी टॉवर, आनंदवली, कॉलेजरोड, सिटी सेंटर मॉल).

परिमंडळ : सातपूर- (सातपूरगाव, अशोकनगर), अंबड - पवननगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजी चौक, दत्त चौक), इंदिरानगर - (राजसारथी, पाथर्डी फाटा, विनयनगर बसस्टॉप), उपनगर - (उपनगर मार्केट, गांधीनगर, नारायणबापूनगर), नाशिकरोड - (शिवाजी पुतळा, जेलरोड, ), देवळाली कॅम्प - (लेविट मार्केट, देवळाली कॅम्प बाजार).

अनुचित प्रकार घडल्यास संपर्क साधा
शहरातील मार्केटपॉइंट ठिकाणी पोलिसांची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास चेकिंग पॉइंटवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मोहिमा सुरू राहाणार आहेत. -श्रीकांत धिवरे, उपआयुक्त (गुन्हे)
बातम्या आणखी आहेत...