आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्त नाशिकः चिखलाचे साम्राज्य, रस्त्यांची चाळण- अशी झाली अवस्था, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरीही मोडला नाही कणा... - Divya Marathi
तरीही मोडला नाही कणा...
नाशिक- संतत धार पावसाने गोदावरीला दुसऱ्या दिवशी पूर अाल्याची स्थिती कायम हाेती. संततधार सुरू असल्याने दोन दिवसांपासून शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी आलेल्या महापुरानंतर गोदाघाटालगतच्या परिसरात सर्वत्र चिखल झाल्याने प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार होती. मात्र, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने गाेदावरीला दिवसांत दोनदा पूर आला.

धरणक्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहर आणि पसिरातील छोट्या नद्या, नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. बुधवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पूर कमी-अधिक झाल्याचे प्राचीन मापक म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आल्याने पूर अोसरल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दुपारी वाजता दुतोंड्याच्या छातीपर्यंत, दुपारी वाजता पुन्हा मानेपर्यंत पाणी आल्याने गोदावरीचा पूर कायम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. पूरजन्य परिस्थितीमुळे दोन दिवस शहर परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस थांबला नाही तर पूरस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. महापुराचे पाणी कमी झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र गोदाकाठालगतच्या सरदार चौक, जानी हाऊस, सरदार चौक, खांदवे सभागृह, कपालेश्वर, सराफ बाजार, मोदकेश्वर, मालेगाव स्टँण्ड, रामवाडी, घारपुरे घाट, तेली गल्ली, रविवार कारंजा अादी ठिकाणांसह नागरिकांच्या घरांतील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर घरात आणि रस्त्यांवर चिखल साचल्याने नागरिकांना चिखल साफ करण्यासाठी आणि संसाराेपयोगी वस्तू शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.

पूरामुळे सराफ बाजाराची दुरवस्था झाली असून परिसरात चिखल साचला अाहे. पुराचे पाणी शिरल्याने दुकानांचे माेठे नुकसान झाले असून बुधवारी व्यावसायिक दुकानांची साफसफाई करत हाेते.

पेठकर प्लाझामध्ये पाणी, सेतूचे नुकसान
पेठकर प्लाझाच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने तेथील पंचवटी सेतू कार्यालयातील कागदपत्रांचे नुकसान झाले. आधारकार्ड, रेशनकार्ड आणि विविध दाखल्यांसाठी पंचवटी परिसरातील नागरिकांनी येथे कागदपत्रे जमा केली होती. ही कागदपत्रे खराब झाली, अशी माहिती सेतू कार्यालयाचे संचालक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

साफसफाईसाठी माेठी कसरत
महापुरापासून वाचण्यासाठी कसरत करणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी घरातील चिखल साफ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मनपा प्रशासनाकडून तोडक्या स्वरूपात नियोजन करण्यात आल्याने बहुतांशी नागरिकांनी स्वखर्चाने घराची स्वच्छता केली.

बुधवारी १८.७ मिमी पाऊस, अाजही पाऊस शक्य
मंगळवारी१८९ मिलिमीटर शहरात पाऊस झाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले. हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू झाल्यानंतर तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांच्या मनात धडकीच भरली. मात्र, हा पाऊस अल्प काळ राहिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत १८.७ मिलिमीटर पावसाची हवामान केंद्रात नोंद करण्यात आली होती. गुरुवारी (दि. आॅगस्ट) हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अनेकांचे संसार पडले उघडयावर....
रामकुंडपरिसरात पूजा साहित्य व्रिकी करणारे, मिठाई विक्रेते, किराणा दुकाने आहेत. या दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबराेबरच पुरात वाहून आलेले साहित्य जमा करण्यासाठी काही तरुणांसह महिलांची गाेदाकाठावर सकाळपासूनच गर्दी होती.

तरीही मोडला नाही कणा.....
गंगामाईपाहुणी आली, गेली घरट्यात राहून... माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली.. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले.. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले..

कधीतरी कानावर पडलेल्या ‘कणा’ कवितेतील कुसुमाग्रजांचे शब्द प्रत्यक्ष डोळ्यांसमोर अवतरावेत अशी परिस्थिती गोदावरीचा पूर ओसरल्यावर पहायला मिळत होती. अर्थात या कवितेमधल्या ओळीप्रमाणे ‘तरी मोडला नाही कणा’ असे म्हणत पुन्हा नव्याने उभे राहून आपला संसार, सावरण्याची धडपडही दिसून येत होती. गोदावरी पात्रालगतच्या परिसरातील कालचे पाण्याचे थैमान आटोक्यात आणताना रहिवाशांचे हाल होत होते. गोदापात्रालगतच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र परिस्थितीची चक्काचूर झाला. सुदैवाने महापूर अाल्याने भाविकांची संख्या कमी असल्याने मोठी जीवितहाननी टळली. अग्निशामक दलाच्या जवानांसह परिसरातील नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

वृक्ष काेसळला तेव्हा सुदैवाने भाविकांची संख्या कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक राहुल ढिकले, दीपक चव्हाण, उल्हास धनवटे, मंदिराचे विश्वस्थ मंदार जानोरकर, पांडुरंग बोडके यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या मदतीने वृक्षांच्या फांद्यामध्ये अडकलेल्या चार नागरिकांना बाहेर काढले. पूजा साहित्य विक्रेत्या सरला मुर्तडक यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार भाविकांना किरकोळ दुखापत झाली. वृक्ष कोसळल्याने मंदिर परिसरातील टपऱ्या, दुकाने, हॉटेलचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या साह्याने झाडाच्या फांद्या कापून दुकानांवर पडलेल्या फांद्या हटवल्या.

सामना करत पुन्हा संसार उभारण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू हाेता. शहरात झालेल्या महावृष्टीमुळे गोदापात्रलगतच्या रामकंुड, सराफ बाजार, बोहाेरपट्टी परिसरातील घरांमध्ये, दुकानांमध्ये माेठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. बुधवारी (दि. ३) पुराचे पाणी ओसरल्यानंतर दुकानांतील उर्वरित साहित्य जमा करताना, तसेच साचलेला गाळ काढण्यासाठी दुकानदारांची नागरिकांची धडपड सुरू होती. महावृष्टीमुळे भांडीबाजारातील अनेक दुकानांमध्ये २० ते २५ फूट पाणी साचल्याने या दुकानांमधील भांडे, देवाच्या मूर्ती, कपडे, दुकानातील फर्निचर वाहून गेल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परिसरात गाळाचे साम्राज्य साचल्यानेही दुकानदारांना सामान वाहून नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.
महावृष्टीमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानामुळे उर्वरित साहित्य काढताना दुकानमालकांसह कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. मात्र, जुना सरकारवाडा परिसरात काही भाजीविक्रेत्यांनी तसेच दुकानदारांनी व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू केल्याने स्थिती पूर्ववत झाल्याचे चित्र होते.

...मात्र अधिकारी फिरले नाही :
सराफबाजार, भांडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये, रस्त्यावर गुडघ्याएवढा गाळ साचलेला गाळ, वीजपुरवठा खंडित, पिण्याचे पाणी नाही अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. मात्र झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे तर दूरच, साधी विचारपूस करण्यासाठी कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकलेसुद्धा नाही, अशा व्यथा अनेक दुकानदारांची व्यक्त केल्या.

अन‌्होत्याचे नव्हते झाले...
दुकानांमध्येमोठ्याप्रमाणावर पाणी शिरल्याने सर्व साहित्य वाहून गेले. अन‌् क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले. -पवन रामावत, किराणा व्यावसायिक

दुकानातील साहित्य गेले वाहून
दुकानातीलसर्वसाहित्य वाहून गेले असून, डोक्यावर संकट निर्माण झाले आहेत. -रामनिवास चौधरी
महापुराने गोदावरीवरील पुलांची दुरवस्था
नदीकाठालगत अनेक इमारतींसह व्यावसायिकांच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी पंप लावून इमारतींच्या तळ मजल्यात, पार्किंगमध्ये साचलेल्या पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पंचवटी येथील पेठकर प्लाझा येथे अग्निशमन विभागाने पाणी काढले. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह महापालिका कर्मचाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
शहरातमंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीसह शहरातील सर्वच नद्यांना महापूर आला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बुधवारी (दि. ३) गोदावरीचा पूरही ओसरला. महापुरामुळे रामवाडी पूल, फॉरेस्ट नर्सरी पूल, चोपडा लॉन्स येथील पुलासह बापू पुलाची प्रचंड दुरवस्था झाली. महापुरामुळे रामवाडी पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षित लोखंडी खांब जाळीची मोडतोड झाली. फॉरेस्ट नर्सरीजवळच्या पूलावर खड्डेचे खड्डे झाले असून, पुलागतचा रस्ता वाहून गेला. त्यामुळे बुधवारी या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. चोपडा लॉन्सलगत पुलाच्या प्रवेशद्वारात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली.

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले होते. मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुरती दाणादाण उडाली. मुसळधार पाऊस आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला महापूर आला होता. गोदावरीच्या रौद्ररूपामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले होते. या महापुरामुळे गोदाकाठलगतच्या नागरिकांचे, शहरातील व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. गोदावरी नदीचा पूर ओसल्यानंतर महापुरामुळे झालेले विदारक चित्र पाहावयास मिळाले.

फॉरेस्टनर्सरी पुलागतचा रस्ता गेला वाहून : महापुरामुळेगोदावरीवरील फॉरेस्ट नर्सरी पुलागतचा डांबरी रस्ताच वाहून गेला. पुलावर प्रवेश करतानाच रस्ता खचल्याने बुधवारी दिवसभर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पालिकेतर्फे या ठिकाणी तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, जेसीबी ट्रॅक्टरने खडी टाकण्याचे काम सुरू होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नाशिकच्या दुरावस्थेचे- Photos
-पुल उखडले... घरात पाणी... नुसते घानीचे साम्राज्य...
बातम्या आणखी आहेत...