आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेलाही अाता पाणी अारक्षणाचे वेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे अाश्वस्त असलेल्या महापालिकेला सध्याच्या पाणीपुरवठ्याविषयी चिंता नसली तरी अाता पुढील वर्षीच्या पाणी अारक्षणाचे वेध लागले असून, यंदा ४५०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडून केली जाणार अाहे.

दरवर्षी अाॅक्टाेबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी अारक्षण ठरविण्यासाठी बैठक हाेत असते. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाण्याची मागणी नाेंदवणाऱ्या महापालिका, पाणीपुरवठा याेजना, एकलहरा विद्युत प्रकल्प, शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या अावर्तनाचे नियाेजन हाेत असते. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे महापालिकेच्या पाणी अारक्षणात माेठी कपात झाली हाेती. महापालिकेने ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केल्यानंतर प्रत्यक्षात गंगापूर धरणातून हजार, तर दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट इतकेच पाणी अारक्षण मंजूर झाले. त्यातही दारणामधील २०० दशलक्ष घनफूट पाणी उचलणे शक्यच नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिकेला वर्षभर पाणी पुरवताना माेठी कसरत करावी लागली. इतिहासात प्रथमच अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद उर्वरित दिवस १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला.

तुलनेत यंदा मात्र पावसाने ‘छप्पर फाड के’ कृपा केल्यामुळे धरणे तुडुंब भरली अाहेत. त्यात अाता तर महापालिका निवडणुकीचे दिवस असल्यामुळे उगाच नगरसेवक नागरिकांचा राेष नकाे म्हणून महापालिकेने ४५०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला अाहे. साधारण अाॅक्टाेबर महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात पालकमंत्र्यांकडून अारक्षणाबाबत बैठकीत निर्णय हाेण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...