आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेल तेथून काढा रेल्वे तिकीट, करा आरक्षण मुश्कील आसान व्हॅन आजपासून नाशिकमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- रेल्वेआरक्षण, तिकिटांबाबत प्रवाशांच्या नेहमीच्या तक्रारीवर रेल्वे प्रशासनाने तोडगा काढला आहे. रेल्वे स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहता नाशिक शहरात जेथे असाल तेथे तिकीट काढण्याची आरक्षण करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ‘मुश्कील आसान’ पीआरएस व्हॅन बुधवारी (दि. १९) नाशिकमध्ये दाखल होत असून, सप्टेंबरअखेरपर्यंत या व्हॅनमधून सकाळी ते रात्री वाजेपर्यंत भाविकांना रेल्वेचे तिकीट काढता येणार आहे.

सिंहस्थात देशभरातून लाखो भाविक नाशिकला येत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे रेल्वे स्थानकावरील सध्याच्या अतिरिक्त तिकीट खिडक्या कमी पडणार आहेत. तिकिटासाठी भाविक प्रवाशांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार आहे. त्यामुळे निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मुश्कील आसान पीआरएस व्हॅनच्या माध्यमातून भाविकांना तिकीट विक्रीची आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. सप्टेंबरअखेरपर्यंत व्हॅन नाशिक शहरात १२ तास कार्यरत राहणार आहे. व्हॅनसोबत दोन कर्मचारी, सुरक्षा जवान तैनात राहतील.

या वेळेत येथे असेल व्हॅन
साधुग्राम: सकाळी ते दुपारी ११.३० वाजता, पंचवटी : दुपारी १२ ते ३, निमाणी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० मेळा बसस्थानक : सायंकाळी ते रात्री वाजेपर्यंत ‘मुश्कील आसान व्हॅन’ या ठिकाणी थांबणार आहे.