आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक कुंभमेळा ब्रँडिंगही आता जागतिक पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुढील वर्षी होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्याचे शंभर देशांत शंभर प्रतिनिधींद्वारे ब्रँडिंग करण्यात येणार असून, त्याच धर्तीवर नाशिकच्याही कुंभमेळ्याचे ब्रँडिंग जगभर करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह शासनाला प्रस्ताव पाठविणार आहेत. अशा प्रकारचे अतिशय व्यापक ब्रॅडिंग करण्यासाठी उज्जैनचा आराखडा तब्बल ७३ कोटींचा, तर नाशिकचा अवघा आठ कोटींचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी कुशवाह आणि महापालिका आयुक्त प्रवीणकुमार गेडाम यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आणखी काही करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी करण्यासाठी उज्जैन कुंभमेळ्याची कामे नियोजन पाहणी दौरा केला. तेथील मूलभूत सुविधा कामांचेच सध्या नियोजन सुरू असून नाशिकची कामे त्याच्या पुढच्या सूक्ष्म नियोजनाच्या टप्प्यात पोहचली असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. मात्र, जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग हाेण्यासाठी उज्जैनने उत्तम नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.

उज्जैनच्या या प्रयत्नांचा आदर्श घेऊन नाशिक-त्र्यंबकच्या कुंभमेळ्याचेही चांगले ब्रॅडिंग करण्यासाठी आता पर्यटन विकास विभाग आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्यासमवेत आणखी कुठल्या विभागांना नियोजनात सहभागी करून घेता येईल, याचा आराखडा तयार करून लागलीच राज्य शासनाची त्यास परवानगी घेण्याचा मानस कुशवाह यांनी या वेळी व्यक्त केला.
तसेच, उज्जैन येथील बरीच कामे किंवा तशा प्रकारचे नियोजन नाशिकमध्ये असलेली जागा, लोकसंख्या आणि उपलब्ध बाबींमुळे करता येणार नसल्याचे सांगत तरीही वेगळे काय करता येईल, याचे नियोजन सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.