महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला आहे. वैद्यकीय विद्याशाखेसह सर्व विद्याशाखांच्या परीक्षांचे अर्ज अॉनलाइन करण्याची सुविधा विद्यापीठाने कार्यान्वित केली आहे. एवढेच नव्हे, तर आरोग्यच्या शिक्षणामधील अभ्यासक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग समजला जाणारा संशोधन प्रबंधही आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन सादर करता येणार आहे.
लवकरच ऑनलाइनची सुविधा सुरू होणार असल्याने राज्यभरातील ५५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आरोग्य विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून हाेत आहे. आरोग्यच्या एकूण सात विद्याशाखांमध्येे ५५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिवाळी उन्हाळी अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होत असून, मे २०१६ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी प्रथमच ऑनलाइन कार्यप्रणाली वापरली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयात हॉलतिकीट उपलब्ध होईल.
विद्यार्थ्यांना होईल या सुविधेचा फायदा
ऑनलाइनपरीक्षाअर्ज संशोधन प्रबंध सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, तसेच विद्यापीठाचेही प्रशासकीय कामकाज कमी होऊन पारदर्शकता येण्यास मदत होईल. डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षानियंत्रक, आरोग्य विज्ञान विद्यापीठ
..अशी असेल ऑनलाइन कार्यप्रणाली
आरोग्यविद्यापीठाच्या www.muhs.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र यूजरनेम पासवर्ड दिला जाईल. त्याद्वारे विद्यार्थ्याने अर्जाद्वारे माहिती सादर करायची आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून ऑनलाइन हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाईल, तसेच पदव्युत्तर पदवीच्या १२ ते १३ हजार विद्यार्थ्यांना आपले संशोधन प्रबंधही आता ऑनलाइन सादर करता येणार आहे. कॉलेजमार्फत संशोधन प्रबंध ऑनलाइन सादर करायचा आहे. त्यानंतर परीक्षकांनाही तो ऑनलाइन दिला जाणार आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, काय आहे आकडेवारी..