आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Police Have Eight Hours Work, R.R. Patil's Remark

पोलिसांना आठ तासच काम, आर. आर. पाटील यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोलिसांना सध्या बारा-बारा तास काम करावे लागते. सुट्या, रजाही मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या तीन महिन्यांत 12 हजार अतिरिक्त पोलिसांची भरती करणार आहोत. जेणेकरून पोलिसांना केवळ आठ तासच काम करावे लागेल व साप्ताहिक सुटीही मिळेल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी केली.


महाराष्‍ट्र पोलिस प्रबोधिनीच्या 108 व्या दीक्षांत समारंभानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, पोलिसांची निवासस्थाने उभारण्यासाठी 1 हजार कोटींचे कर्ज हुडकोकडून काढून व्यापक कार्यक्रम हाती घेणार आहोत. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. अनुभवी पोलिस अधिकारी तपास करीत आहेत. मला त्यांच्यावर विश्वास असून तेच छडा लावतील. सीबीआयकडे तपास देण्याची गरज नाही, असे पाटील म्हणाले.