आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या साेयीसाठी रामकुंडात टाकणार अाज टँकरद्वारे पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रशासनाच्या वतीने लक्ष्मणकुंडातील गाळ, कचरा काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लक्ष्मणकुंड, रामकुंडाची पूर्णपणे स्वच्छता केल्यानंतर भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी (दि. ८) महापालिका प्रशासनाच्या वतीने कोरड्या पडलेल्या रामकुंडात टँकरद्वारे पाणी टाकून भरण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्रशासनातर्फे जून रोजी गोदावरी नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या माेहिमेत पालिका कर्मचाऱ्यांबराेबरच स्वयंसेवी संस्था नागरिकांनी सहभाग घेतला हाेता. या स्वच्छता मोहिमेमुळे नदीपात्रालगतचा कचरा हटविण्यात आल्याने परिसर स्वच्छ होण्यास हातभार लागला होता. या स्वच्छता मोहिनेनंतर महापालिकेच्या बांधकाम आरोग्य विभागाच्या वतीने लक्ष्मणकुंडातील गाळ, कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रामकुंड पूर्णपणे काेरडा करण्यात आला आहे. मंगळवारी अग्निशमन दलाच्या सहकार्याने या दोन्ही कुंडांची स्वच्छता करण्यात आली. लक्ष्मणकुंडाची स्वच्छता झाल्यानंतर भाविक, नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी बुधवारी पाणी टाकण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामामुळे रामकुंड कोरडेठाक पडल्याने मात्र या ठिकाणी दशक्रिया विधीसह अन्य विधी करणाऱ्या नागरिकांना कोरड्या पात्रात विधी करायचा का, असा प्रश्न पडतो. तसेच, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना रामकुंडाच्या येथे असलेल्या गोमुखातून पडणाऱ्या पाण्यावरच समाधान मानावे लागत असल्याने त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अग्निशमन दलाचे माेहिमेत सहकार्य
लक्ष्मणकुंड, रामकुंडाचीस्वच्छता करण्यात येत असून, स्वच्छता झाल्यानंतर रामकुंडात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येणार आहे. - संजय गोसावी, विभागीयस्वच्छता अधिकारी
बातम्या आणखी आहेत...