आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठातही शिष्यवृत्ती मिळणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिष्यवृत्ती लागू करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानंतरही मुक्त विद्यापीठाने तीन वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष केल्याने लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी कुलसचिवांना निवेदन देत त्वरित शिष्यवृत्ती लागू करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत कुलसचिवांनी बुधवारी दुपारीच तत्काळ बैठक घेत त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच दोन्ही खात्यांच्या मंत्र्याशीच थेट चर्चा करण्याचीही तयारी दर्शवली.
केंद्र शासनाने मागासवर्गीय, अल्पसंख्याक प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सर्वच विद्यापीठांनी त्वरित शिष्यवृत्ती लागू करण्याचे आदेश 2010 सालीच राज्य शासनास दिले होते. त्यानुसार शासनाच्या समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाने मुक्त विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांने तसे लेखी आदेशही दिले.मात्र विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याबाबत तक्रारी प्राप्त होताच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांना निवेदन देत शिष्यवृत्ती लागू करण्याची मागणी केली. त्यानंतर कुलसचिवांनी त्वरित दुपारीच बैठक घेण्याचे जाहीर केले.
मंत्र्यांशी भेटूनच तोडगा
हे विद्यापीठ विनावेतन अनुदानित आहे. त्यामुळे ते कसे बसविता येतील याबाबत बैठकीत चर्चा झाली. समाजकल्याण आणि आदिवासी विकास या दोन्ही खात्यांच्या मंत्र्यांशी तत्काळ भेट घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल.’’
डॉ. एन.आर.शिंदे, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख, मुक्त विद्यापीठ.