आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता कर भरण्यापासून पार्किंगपर्यंत स्मार्ट कार्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी याेजनेतील माेठ्या प्रकल्पांना विलंब लागण्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अाता पॅन सिटीतील छाेट्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी कंबर कसली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध प्रकारचे कर भरण्यापासून तर अाॅनलाइन शाॅपिंग तसेच डेबिट पद्धतीने वापर करण्यासाठी महापालिकेचेच स्मार्ट कार्ड तयार केले जाणार अाहे. त्याबराेबरच पार्किंगचाही मुद्दा पहिल्या टप्प्यात मार्गी लावला जाणार अाहे.
स्मार्ट सिटीत नाशिकचा समावेश झाल्यानंतर नाशिक महापालिका काॅर्पाेरेशनची पहिली बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत स्मार्ट सिटीतील गावठाण पुनर्विकास हरित क्षेत्र विकासासारख्या याेजना साकारताना प्रचंड अडचणी येणार असल्याचे स्पष्ट झाले हाेते. गावठाणात मुळात जागा मालकीवरून वाद असल्यामुळे पुनर्विकास करून सुटसुटीत शहर विकासाचे स्वप्न कागदावरच राहणार असल्याचा सूर व्यक्त झाला हाेता. तसेच, या ठिकाणी वाढीव एफएसअाय दिल्यानंतरही प्रत्यक्षात अंमलबजावणी अशक्य असल्याची चिंता व्यक्त हाेत हाेती. दरम्यान, हरित क्षेत्र विकासासाठी हनुमानवाडीचा विचार करण्यात अाला असला तरी या ठिकाणी विखुरलेल्या जागा असल्यामुळे स्मार्ट हरित क्षेत्र विकास कसा हाेईल, असाही प्रश्न निर्माण झाला हाेता. विशेष म्हणजे, टीपी स्कीमची मालकी महापालिकेची असल्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला हरित क्षेत्र विकासासाठी संबंधित अधिकार कसे देता येईल, असाही सवाल झाला हाेता. माेठे प्रकल्प मार्गी लावण्यातील अडचणी लक्षात घेत अाता अायुक्तांनी छाेट्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला अाहे. पॅन सिटीमध्ये पार्किंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्मार्ट कार्ड प्रणाली, पूरनियंत्रण प्रणाली, अाराेग्य शिक्षण क्षेत्रातील संबंधित काही झटपट मार्गी लागतील अशा स्मार्ट याेजना प्राधान्याने हाती घेतल्या जाणार अाहेत.

या सर्व याेजनांमध्ये स्मार्ट कार्ड ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी याेजना असून, यात महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टीसारखे कर भरता येतील. त्याचबराेबर बांधकाम करणाऱ्यांना विकास शुल्क भरता येईल. हेच कार्ड शाॅपिंगसाठी लिंक करण्याचा विचार असून, त्यावर माेठमोठे माॅल्स, हाॅटेल्समध्ये खरेदी-विक्री, हाॅटेलिंग करता येणार अाहे.

अायुक्तनाेव्हेंबरनंतर प्रशिक्षणाला जाणार : महापालिकाअायुक्त कृष्णा हे २८ नाेव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत अायएएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी जाणार असल्यामुळे या काळात पालिकेचे कामकाज ठप्प हाेण्याची भीती अाहे. डिसेंबरनंतर महापालिका निवडणुकीची अाचारसंहिता लागू हाेणार असल्यामुळे अायुक्तांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा अाहे.
मीरा-भाईंदरप्रमाणे अास्थापनांची नोंदणी

अाचारसंहितेपूर्वी तज्ज्ञ सल्लागार
नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी याेजनेसाठी उत्पन्नवाढीचा निर्णय घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिक अास्थापनांची नोंदणी करून घेतली जाणार अाहे. त्या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर पाठवला जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांनी स्पष्ट केले. सध्या दुकानांची नाेंदणी कामगार खात्याकडे अाहेे. मात्र, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात ज्याप्रमाणे दुकानांची नोंदणी केली जात असल्यामुळे महापालिकेत त्याच नियमाचा वापर करून नाेंदणी केली जाणार अाहे.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची अाचारसंहिता लागू हाेण्यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीतील महत्त्वाची पदे भरण्याचा प्रयत्न अाहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणुकीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार अाहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा अधिकारी हा अायएएस असल्यामुळे शासनाकडून नेमणूक हाेणार अाहे. तज्ज्ञ सल्लागार म्हणून क्रिसिल वा मॅकेन्झीसारखी संस्था नेमली जाणार असून, त्यासाठी निविदा काढली जाणार अाहे. याव्यतिरिक्त सचिवपदही भरले जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...